Nashik Crime News: 30 लाखांचे वन्यजीवांचे अवयव जप्त! गुप्तचर संचालनालय, वनविभागाची संयुक्त कारवाई; एकास अटक

Crime News : वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये ७८१ घोरपडीचे लिंग व २० किलो इंद्रजाल असा सुमारे तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
Wildlife organs seized in operations by Directorate of Revenue Intelligence and Forest Department, suspects. Neighboring forest department officials, staff.
Wildlife organs seized in operations by Directorate of Revenue Intelligence and Forest Department, suspects. Neighboring forest department officials, staff.esakal
Updated on

Nashik Crime News : अस्वलदरा (ता.नांदगाव) येथून महसूल गुप्तचर संचालनालय आणि वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये ७८१ घोरपडीचे लिंग व २० किलो इंद्रजाल असा सुमारे तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित आदेश खत्री याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास गुरुवार (ता.१८) पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. शनिवारी (ता.१३) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Crime Wildlife parts worth 30 lakh seized news)

अस्वलदरा येथील संशयित खत्री हा वन्यप्राणी यांच्या अवयवांची तस्करी करत आल्याची माहिती मुंबई विभागाच्या गुप्तचर संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली होती. यानंतर विशेष पथकाने वनविभागाच्या मदतीने शनिवारी (ता.१३) रात्री संशयित आदेश खत्री याच्याकडे घोरपडीचे लिंग आणि इंद्रजाल खरेदी करण्यासाठी एक बनावट ग्राहक पाठविले.

यावेळी आदेश खत्री याने त्यास इंद्रजाल व घोरपडीचे लिंग उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने खत्री याच्या घरावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून ७८१ घोरपडीचे लिंग व २० किलो इंद्रजाल असा सुमारे तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

महसूल गुप्तचर संचालनालयाचे निखिल सावंत व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे, विभागीय अधिकारी(दक्षता) विशाल माळी प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक अक्षय म्हेत्रे, नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगांव व येवला वनपरिक्षेत्रातील विनोद जवागे, वनरक्षक विष्णू राठोड, सुरेंद्र शिरसाट, नवनाथ बिन्नर, अमोल पाटील, संजय बेडवाल, अमोल पवार, रवींद्र शिंदे, पंकज नागपुरे आदी कर्मचाऱ्यांनी केली.

याप्रकरणी संशयित आदेश खत्री पवार विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.ढोले करीत आहे.  (latest marathi news)

Wildlife organs seized in operations by Directorate of Revenue Intelligence and Forest Department, suspects. Neighboring forest department officials, staff.
Nashik ESIC Hospital : संकेतस्थळ नादुरुस्तीमुळे इएसआयसीत रुग्णांचे हाल

१२ दिवसात दुसरी कारवाई

आदेश खत्री याच्यावर कारवाई होण्यापूर्वी २ एप्रिल २०२४ रोजी वनविभागाच्या वणी पथकानेही नांदगाव येथील रुपेश भोसले याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून १९९ घोरपडीचे लिंग जप्त केले आहे. अशा प्रकारे बारा दिवसात वनविभागाने तालुक्यातून सुमारे एक हजार घोरपडीचे लिंग जप्त केले आहे.

या कारवाईमुळे तालुक्यातील वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. मनमाड हे स्टेशनचे गाव असल्यामुळे या सदर तस्करी ही मध्यप्रदेशातून झाली असावी असा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व्यक्त केला.

"सदर कारवाईचा तपास वनविभागाकडून केला जात आहे. अजून चार ते पाच संशयित फरार आहे. त्यांच्या मागावर वनविभागाचे अधिकारी आहेत. सीडीआर तसेच फॉरेन्सिक चे तंत्र विश्लेषण सुरू आहे. गरज पडल्यास डीएनए केले जाईल."

- उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पूर्व)

Wildlife organs seized in operations by Directorate of Revenue Intelligence and Forest Department, suspects. Neighboring forest department officials, staff.
Nashik News : उपनगरची घटना ही पूर्वनियोजित आमदार देवयानी फरांदे यांचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.