Nashik Cyber Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर ट्रेडिंगचे आमिष भोवले! सायबर भामट्यांनी घातला चौघांना 60 लाखांना घातला गंडा

Crime News : शेअर्स मार्केट ट्रेडिंग व वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील चौघांना तब्बल ६० लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शेअर्स मार्केट ट्रेडिंग व वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील चौघांना तब्बल ६० लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (​​Work from home share trading lured 60 lakhs extorted from four people)

तक्रारदार युवकाला जानेवारी २०२४ मध्ये संशयित टेलिग्रामधारक सायबर भामट्याने वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून आर्थिक कमाई करण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार, संशयिताने तक्रारदार युवकाला लिंकही पाठविली. तसेच फेम मेल आईडीही पाठविला. परंतु कामाचा मोबदला मिळण्याऐवजी तक्रारदार युवकाचीच सुमारे २४ लाखांची फसवणूक सायबर भामट्याने केली.

त्याचप्रमाणे, राजधर पाटील यास सायबर भामट्यांनी अपोलो ग्लोबल फायनान्सीयल या व्हॉटसॲपवरून संशयित सांची अरोरा, रवींद्र हुसेन यांनी लिकं पाठवून शेअर ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखविले. या माध्यमातून संशयितांनी पाटील यांची २४ लाख २२ हजारांची फसवणूक केली. (latest marathi news)

Cyber Crime
Hanuman Nagar Crime : कुटुंब देवदर्शनासाठी गेल्याची चोरट्यांनी साधली संधी; गजबजलेल्या हनुमाननगरात फोडला बंगला!

तसेच, मनिषा पाटील यांनाही सायबर भामट्यांनी एचडीएफसी सेक्युरिटीज्‌ या व्हॉटसॲप ग्रुपमधील संशयित रामा पटेल, सेन गुप्ता, अभिजित सिंग यांनी व्हॉटसॲप लिंक शेअर केली आणि शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष दाखवून ७ लाख ७० हजार १०० रुपयांचा गंडा घातला आहे.

तर, सनत शंकर चक्रवर्ती यांनाही सायबर भामट्यांनी शेअर मार्केट ट्रेडिंगच आमिष दाखवून ५ लाख ५१ हजार रुपयांना गंडा घातला. अशारितीने सायबर भामट्यांनी या चौघांना तब्बल ६० लाख ५७ हजार ४४९ रुपयांचा गंडा घातला असून, याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Crime
Nashik Crime News : ओझर येथे फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन लाख चौतीस हजाराला लुटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.