Nashik Bribe Crime : येवल्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना 20 हजारांची लाच घेताना अटक

Bribe Crime : गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना २० हजार रुपयांची लाच देताना शुक्रवारी (ता. ५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले.
Machhindranath Dhas
Machhindranath Dhasesakal
Updated on

Nashik Bribe Crime : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना २० हजार रुपयांची लाच देताना शुक्रवारी (ता. ५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. तर प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन रहाटळ यांनाही लाच घेताना पथकाने अटक केली. एकाच दिवशी तालुक्यात दोन लाचेच्या कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. येथील पंचायत समितीत अनेक कामांचे दर ठरल्याची चर्चा यापूर्वी होती. (Yeola Group Development Officer arrested for taking bribe )

आजच्या कारवाईने यावर शिक्कामोर्तब झाले. तक्रारदाराचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत २०२२-२३ मध्ये प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदार मार्फत विकासकामे झालेले आहे. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी धनादेशावर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाचे २ टक्के या प्रमाणे २० हजार रुपयाची लाच गटविकास अधिकारी यांनी मागितली होती.

शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धस यांना पंचासमक्ष लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक, सापळा व तपास अधिकारी नीलिमा डोळस, हवालदार श्री.गांगुर्डे, पोलिस नाईक संदीप हांडगे, सुरेश चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

Machhindranath Dhas
Nashik Bribe Crime News : स्वतंत्र रेशनकार्ड करण्यासाठी सेतू कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

अव्वल कारकून जाळ्यात

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून वर्ग ३ चे जनार्दन रहाटळ यांना ७०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराचे चुलत चुलते यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला येथे भूसंपादनाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. सदर दाखला देण्याच्या मोबदल्यात आरोपी, लोकसेवक रहाटळ यांनी दोन दिवसांपूर्वी १ हजार१०० रुपयाची मागणी करून सदर दिवशी भेटीदरम्यान शंभर रुपये स्वीकारले तर उर्वरित एक हजार रुपये लाचेची मागणी केली.

त्यानंतर तडजोडी अंती ७०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदर लाचेचे ७०० रुपये शुक्रवारी त्यांना स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. पोलिस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके, परशराम जाधव, स्वप्नील राजपूत आदींनी ही कारवाई केली.

लाचेच्या कारवाईचे दुसरे बिडिओ

येथील पंचायत समितीच्या अनेक सुरेश कथा नेहमीच ऐकायला मिळतात,त्यामुळे येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांच्या घटनाही नेहमीच घडत असतात. विशेष म्हणजे याच कार्यालयात यापूर्वी गटविकास अधिकारी श्री. अहिरे यांच्यावरही अशीच कारवाई झाली होती. त्यानंतर आज श्री. धस यांनाही रंगेहात पकडल्याने लाच घेताना पकडल्याची कारवाई झालेले ते येथील दुसरे गटविकास अधिकारी ठरले आहेत.

Machhindranath Dhas
Nashik Bribe Crime : लाचखोर APIला पुन्हा PSI! आयुक्तांचा दणका; वर्षभरासाठी पदावनत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.