Nashik Crime News : दुचाकी दुरुस्तीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सोमवारी (ता.२२) भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन ऊर्फ बबल्या सुरेश सावंत (वय ३५, रा. शिवाजी नगर, नाशिक-पुणे रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. चार दिवसांपूर्वीच मुंबई नाका हद्दीतील सहवास नगर येथे जुन्या वादातून तरुणाचा खून झाला होता. Youth beaten to death for bike repair money marathi)
ही घटना ताजी असतानाच पुन्हा खून झाल्याने शहरातील खुनाचे सत्र थांबता थांबेना, असे चित्र आहे. मृत सचिन सावंत याने त्याचा मित्र संशयित मयूर कदम यास दुचाकी दुरुस्तीसाठी ९ हजार रुपये दिले होते. त्यातील ४ हजार ५०० रुपये परत मागितले. त्याच्या रागातून संशयित मयूर कदमने सचिन यास बुधवारी (ता.१७) रात्री गाडगे महाराज मठास लागून असलेल्या महापालिकेच्या पडीक इमारतीत बोलावून घेतले.
त्या ठिकाणी संशयिताचा मित्र आणि संशयिताने मृत सचिनशी वाद घातला. वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. त्याच्या गुप्तांगसह विविध भागात गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत सचिन स्वतः जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. शुक्रवार (ता.१९) पर्यंत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्रास अधिक झाल्याने त्याने आई आणि मामा यांना घरी घेऊन जाण्याची मागणी केली. त्यानुसार उपचार सुरू असताना रुग्णालयातून त्यास घरी नेले. रात्रभर त्यास त्रास जाणवला.
शनिवारी (ता.२०) सकाळी झोपेतून उठवले असता त्याची हालचाल होत नसल्याचे आढळले. त्यामुळे पुन्हा त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत प्रथमत: आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. चौकशीअंती घटनास्थळ भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील असल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवार (ता.२२) भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित मयूर कदम आणि त्याच्या मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मठाच्या नावामुळे गोंधळ
भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील गाडगे महाराज मठ परिसरात घटना घडली होती. जिल्हा रुग्णालयातील पोलिसांना मात्र जनार्दन स्वामी मठ परिसरात घटना झाल्याची माहिती मिळाली होती. जनार्दन स्वामी मठ आडगाव पोलिस ठाणे हद्दीत येत असल्याने त्या ठिकाणी वैद्यकीय नोंद (एमएलसी) झाली. आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद करून घेतली. त्यानंतर भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील घटनास्थळाची खात्री झाल्यानंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. घटनास्थळाच्या चुकीच्या माहितीमुळे पोलिसांचाही गोंधळ झाला.
घरी जाऊन घेतली तक्रार
मृत सचिन सावंत याची आई वयस्कर असून एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा धक्का लागला बसल्याने पोलिस ठाण्यात येण्याची तिची परिस्थिती नव्हती. यामुळे भद्रकाली पोलिसांनी नाशिक-पुणे रोडवरील पळसे परिसरातील शिवाजी नगर येथे जाऊन सचिनची आई सिंधू सावंत यांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.