वावी : जुन्या भांडणाची कुरापत काढून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे 40 वर्षीय तरुणास जमावाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील 13 जणांच्या विरोधात खुन व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Youth beaten to death in Pathare news)
सोमनाथ भाऊसाहेब आदमाने असे मारहाणीत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपल्या कुटुंबासमवेत ते पाथरे बुद्रुक शिवारात राहतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आदमाने कुटुंबीय जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना गावातील राहटळ कुटुंबातील व्यक्तींनी जमावाने येऊन घराचा दरवाजा तोडला व घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.
लाकडी दांडे लोखंडी पाईप लोखंडी गज यासारख्या प्राणघातक वस्तूंनी मारहाण केल्यामुळे सोमनाथ आदमाने हे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (latest marathi news)
सून मनीषा व नात संस्कृती यांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली असे मृताचे वडील भाऊसाहेब आदमाने यांनी म्हटले आहे. शरद दगु राहटळ, संतोष दत्तात्रय राहटळ, सागर शरद राहटळ, नितीन बाळासाहेब राहटळ यांनी केलेल्या मारहाणीत मुलगा सोमनाथ याचा मृत्यू झाला.
तर सचिन बाळासाहेब राहटळ, तुषार राजेंद्र राहटळ, रविंद्र दत्तात्रय राहटळ, तेजश्री सचिन राहटळ, मंदाकिनी दत्तात्रय राहटळ, अनिता संतोष राहटळ , सुनिता शरद राहटळ, शैला बाळासाहेब राहटळ, ज्योती रविंद्र राहटळ सर्व रा पाथरे बु. यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण केली असे श्री. आदमाने यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार वरील सर्वांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पाराजी वाघमोडे, हवालदार सचिन काकड तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.