Nashik Crime: हल्ल्यात जखमी झालेल्या सोमठाणे येथील तरुणाचा मृत्यू; सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप

Crime News : नातेवाईकांनी हल्ल्याची सुपारी देणाऱ्या संशयितांच्या घरासमोर अंत्यविधी करण्याची भूमिका घेतल्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Kishore Rambhau Dhokrat
Kishore Rambhau Dhokratesakal
Updated on

सिन्नर : शेतजमिनीच्या वादातून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील 30 वर्षीय युवकावर सोमवारी सायंकाळी शेजारच्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. चोपर व कोयत्याने वार करण्यात आल्याने या युवकावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र त्याची प्रकृती ढासळल्यामुळे त्यास बुधवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे सोमठाणे गावात सायंकाळी अंत्यविधीपूर्वी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मृताच्या नातेवाईकांनी हल्ल्याची सुपारी देणाऱ्या संशयितांच्या घरासमोर अंत्यविधी करण्याची भूमिका घेतल्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (Nashik Crime Youth from Somthane dies of injuries in attack sinnar)

कृष्णा उर्फ किशोर रामभाऊ धोक्रट (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावातीलच सचिन गोविंद कोकाटे याचे सोबत त्याचे शेतजमिनीचे वाद होते. याशिवाय सचिन याची पत्नी त्याला सोडून तिच्या आई-वडिलांकडे राहत असल्याने व तिचे नातेसंबंधातील धोक्रट कुटुंबाकडे जाणे येणे असल्याने देखील सचिन याचा कृष्णा व त्याच्या कुटुंबीयांवर राग होता.

पत्नीला धोक्रट कुटुंबीय व कृष्णा फूस लावत असल्याने ती नांदायला येत नसल्याचा संशय सचिनला होता. सोमवारी सायंकाळी खेडलेझुंगे येथील सोमठाणे कडे जाणाऱ्या त्रिफुलीवर दोन स्थानिक युवकांसह आणखी चौघा जणांनी कृष्णा याचेवर चोपर व कोयत्याने वार केले होते.

हा हल्ला सचिन कोकाटे याने त्याचे चुलते बाळासाहेब रघुनाथ कोकाटे यांच्या मदतीने सुपारी देऊन घडवून आणल्याची फिर्याद मयत कृष्णा याचा भाऊ प्रवीण उर्फ सोनू धोक्रट याने लासलगाव पोलीस ठाण्यात दिली होती. राहुल उर्फ डोम्या सुभाष आहेर व विकास उर्फ विकी सोमनाथ गायकवाड दोघे रा. खेडलेझंगे, निफाड व त्यांचे इतर अनोळखी ०४ साथीदारांनी वरील दोघांकडून सुपारी घेऊन हा हल्ला केल्याचे प्रवीण याने फिर्यादीत म्हटले होते.

प्राणघातक हल्ला झाल्यानंतर कृष्णा यास स्थानिकांनी निफाड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे नाशिक येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच कोयत्याचे वार केल्यामुळे पोटातून कोथळा बाहेर पडला होता. (latest marathi news)

Kishore Rambhau Dhokrat
Nashik Crime News : नांदूर शिंगोटे येथे स्वामी समर्थ मंदिरात चोरी!

अवघड शस्त्रक्रिया करून देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे व मोठा उपचाराचा खर्च पेलवणारा नसल्याने कृष्णा यास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा गुरुवारी सकाळी नऊ वाजता मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कोकाटे व धोक्रट कुटुंबीयांमध्ये असणारे शेतीचे व कौटुंबिक वाद सर्वांना माहीत असल्यामुळे व सचिन कोकाटे यांच्याकडून यापूर्वी देखील अनेकदा कृष्णा यास धमकवण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नाशिक येथून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंत्यविधी सोमठाणे येथे अमरधाम मध्ये न करता कोकाटे कुटुंबीयांच्या घरासमोर करण्याची भूमिका घेतली.

त्यामुळे सोमठाणे गावात तणावाची परिस्थिती तयार झाली होती. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सिन्नर निफाड तालुक्यातील पोलिसांचा लवाजमा सोमठाणे येथे तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी धोक्रट यांच्या नातेवाईकांची समजूत काढत होते. संशयित सचिन कोकाटे व बाळासाहेब कोकाटे यांना लासलगाव पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले असल्याचे सांगूनही नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

Kishore Rambhau Dhokrat
Crime News : झोपेत असलेल्या बेघराला नशेखोर गुंडांनी पेटवले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.