Nashik News : परिसरातील देवळालीगाव वालदेवी नदीकिनारी असणाऱ्या रोकडोबावाडी येथील शिवाजी पुतळ्याजवळ अरमान मुजावर शेख नामक युवकावर वार करण्यात आले. आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik crime Youth killed in Koyta gang attack)
मंगळवारी (ता. ७) रात्री साडेदहाला अरमान शेखनामक युवक रस्त्यावरून चाललेला असताना नाशिक रोड येथील कोयताधारी हल्लेखोरांनी शेखच्या मागून येत सपासप वार केले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. जखमी शेखचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
त्यास बिटको रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची वार्ता परिसरात समजताच खळबळ उडाली. (latest marathi news)
रात्री शतपावली करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, नाशिक रोड परिसरात सध्या कोयता गॅंगची दहशत वाढत चालली आहे. उपनगर पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.