Nashik Crime News : लिफ्ट मागून युवकाची लुटमार; नाशिकरोडच्या सौभाग्यनगरमधील घटना

Nashik : नाशिकरोड परिसरातील सौभाग्यनगरमध्ये लिफ्ट मागून बसलेल्या युवकाने व त्याच्या साथीदारांनी एका युवकाला दमदाटी करून त्याच्याकडील मोबाईल व सोन्याचे चैन बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.
Crime
Crime esakal
Updated on

Nashik Crime News : नाशिकरोड परिसरातील सौभाग्यनगरमध्ये लिफ्ट मागून बसलेल्या युवकाने व त्याच्या साथीदारांनी एका युवकाला दमदाटी करून त्याच्याकडील मोबाईल व सोन्याचे चैन बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात तिघा अज्ञात संशयितांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime)

संदीप विठ्ठल आहिरे (रा. पांडुरंग नगर, विहितगाव, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते गुरुवारी (ता.२) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सौभाग्यनगरच्या नाना-नानी गार्डन रेल्वेपटरीजवळून मोपेडने जात होते.

त्यावेळी अज्ञात संशयिताने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली असता, त्यांनी लिफ्ट दिली. काही अंतरावर गेल्यावर मोपेडवर बसलेल्या संशयिताने संदीप आहिरे यांना मोपेड थांबविण्यास सांगितले. (Latest Marathi News)

Crime
Crime News : पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट ; चौघांना अटक,बेवारस मृतदेह सापडल्याचा उलगडा

त्याप्रमाणे त्यांनी मोपेड थांबविताच, अचानक दोन संशयितांनी धावत येऊन संदीप आाहिरे यांची कॉलर पकडून दमदाटी करीत बळजबरीने त्यांच्या खिशातील १५ हजारांचा मोबाईल आणि गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक जितेंद्र माळी हे तपास करीत आहेत.

Crime
Crime News: कल्याण जवळ दुकानात सापडला ४ कोटींच्या एमडीचा साठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.