Nashik Crime : गेल्या आठवड्यात बजरंगवाडीत झालेल्या राड्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराशी असलेले संबंध आणि त्या राड्यात केलेल्या हाणामारीत प्रत्यक्ष सहभाग असल्याने पोलीस अंमलदाराला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून कसून तपास सुरू असून, पोलीस - गुन्हेगारांच्या संबंधातील आणखी एकप्रकरण यानिमित्ताने उघडकीस आले आहे. दरम्यान, याप्रकरणातील संशयितांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Nashik criminal Friend police Arrested in Bajrangwadi riots case Possibility of action under Mokka marathi news)
नासर्डी नदीकिनारी असलेल्या बजरंग वाडीमध्ये गेल्या आठवड्यात दोन गटामध्ये रात्रीच्या वेळी हाणामारीची घटना होऊन राडा झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटातील सुमारे ३० जणांविरोधात दंगलीचा गुन्हा मुंबई नाका पोलिसात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सराईत गुन्हेगार जुबीन सय्यद (रा. खडकाळी) याच्या टोळीने बजरंगवाडीत जाऊन मारहाण केली.
या मारहाणीच्या घटनेमध्ये आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमलदार इरफान मन्सुर शेख (रा. वडाळागाव) याचाही समावेश असल्याने पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी इरफान यास अटक केली आहे. एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याची आज (ता. २०) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार इरफान शेख याची सराईत गुन्हेगार जुबीन सय्यद याच्याशी मैत्री असून, तो खबरी असल्याचे समोर आले आहे. परंतु तरीही मारहाणीच्या घटनेमध्ये अंमलदार इरफान याचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झाला असून, त्यात तोही जखमी झाला होता.
याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. इरफानचे वडीलही सेवानिवृत्त पोलीस अंमलदार असून, भाऊ पोलीस कर्मचारी आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय दबावही असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. (latest marathi news)
खबरी की मैत्री?
सराईत गुन्हेगार जुबीन सय्यद याच्यावर तडीपारीचीही कारवाई यापूर्वी झाली आहे. तसेच, तो एमडी ड्रग्सप्रकरणातही यापूर्वी अटक झालेला आहे. तर, पोलीस अंमलदार इरफान याची जुबीन याच्याशी ‘खबरी’च्या माध्यमातून मैत्री असल्याचे बोलले जाते. परंतु त्यापलिकडेही त्यांची मैत्री आहे का, याचीही चर्चा असून, त्यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ग्रामीणमध्येही कारवाई
दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कळवण येथील उपनिरीक्षकाचा वाढदिवस सराईत गुन्हेगाराकडून साजरा करण्यात आल्याचा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असता त्याची गंभीर दखल अधीक्षक कार्यालयाकडून घेण्यात आली आहे.
याप्रकरणी उपनिरीक्षक विजय कोठावळे यांची थेट मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील जवळीक कधी लपून राहिलेले नाहीत, परंतु अलिकडे सोशल मीडियावरही झळकू लागल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.
"संशयित पोलीस अंमलदाराचा प्रत्यक्ष मारहाणीत सहभाग असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. खबरी असणं आणि गुन्हेगारी घटनेत प्रत्यक्ष सहभाग असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. तपास सुरू असून कठोर कारवाई केली जाईल."
- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.