Nashik Police: ‘नेत्यां’च्या संपर्कातील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर! आयुक्तालयाकडून पोलिस ठाणेनिहाय संबंधितांची यादी तयार

Nashik News : अशा गुन्हेगारांची माहिती पोलिस ठाणेनिहाय तयार करण्यात येत असून, संबंधितांच्या हालचालींवर बारकाईने ‘वॉच’ ठेवतानाच वेळप्रसंगी कठोर कारवाईही होण्याची शक्यता आहे.
Police, Politician & criminals
Police, Politician & criminalsesakal
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पातळीवर वातावरण तापत असताना दुसरीकडे मात्र शहरात निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. त्या पार्श्र्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या संपर्कातील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रामुख्याने अशा गुन्हेगारांची माहिती पोलिस ठाणेनिहाय तयार करण्यात येत असून, संबंधितांच्या हालचालींवर बारकाईने ‘वॉच’ ठेवतानाच वेळप्रसंगी कठोर कारवाईही होण्याची शक्यता आहे. (Nashik Criminals in contact with leaders on police radar news)

लोकसभा निवडणुकीची ‘राजकीय’ धामधूम सुरू झाली आहे, तर प्रशासकीय यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे. निवडणूक काळात शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.

निवडणुकीदरम्यान राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांचाही वापर होत असतो. या गुन्हेगारांमुळे मतदारांवर प्रभाव पाडून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न राजकीय नेते-पदाधिकाऱ्यांकडून केला जातो. लोकसभा निवडणुकीत असे प्रकार रोखण्यासाठी शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कडक धोरण स्वीकारले आहे.

त्यासाठी पोलिस ठाणेनिहाय कठोर उपाययोजनांसह राजकीय गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने राजकीय पक्ष, नेते, पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात गुन्हेगार असतात. याच गुन्हेगारांचा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

ही बाब हेरून आयुक्तालयाकडून पोलिस ठाणेनिहाय अशा गुन्हेगारांची गोपनीयतेने माहिती संकलित केली जात आहे. अशा गुन्हेगारांच्या हालचालींवरही पोलिसांकडून बारकाईने ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. तसेच, प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाण्याचीही शक्यता आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील राजकीय नेत्यांच्या संपर्कात असलेल्या गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

Police, Politician & criminals
Nandurbar Lok Sabha: वडिलांनंतर मुलगा आजमावतोय आता लोकसभा उमेदवारीतून नशीब! डॉ. गावित व ॲड. पाडवींना राजकीय ‘श्रीगणेशा’ची संधी

- राजकीयदृष्ट्या फायदा करून घेण्यासाठी सराईत गुन्हेगारांचा वापर

- राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातील गुन्हेगारांकडून मतदारसंघातील/प्रभागातील मतदारांना प्रभावित केले जाऊ शकते

- निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांची यादी

- पोलिस रेकॉर्डवर नाहीत. परंतु निवडणूक काळात गैरप्रकारे वापर करून मतदारांवर प्रभाव पाडू शकणाऱ्या व्यक्तींचीही यादी

"निवडणुकीमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांचा वापर होऊ शकतो. तो होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अशा गुन्हेगारांची माहिती संकलित करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे."- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा

Police, Politician & criminals
Nashik Traffic Police: मोबाईलने नव्हे तर, ‘इ-चलन’ मशिनद्वारे करा कारवाई; वाहतूक पोलिसांच्या हाती दिसू लागले ‘इ-चलन’ मशिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.