Lavani Artist Employment: लावणी कलावंतांच्या रोजगारावर गदा! प्रमुख लोककला दुर्लक्षित; शासनाकडून पाठबळाची अपेक्षा

Nashik News : अलीकडे समारंभात, लाइव्ह ऑर्केस्ट्रामुळे लावणीची मागणी कमी असल्यामुळे लावणी कलावंतांना काम मिळण्याचे प्रमाण कमी आहे.
Lavani Artist
Lavani Artistesakal
Updated on

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रमुख लोककलेमधील सर्वात लोकप्रिय लावणी समजली जाते. लावणी म्हटलं, की ढोलकीची थाप, घुंगरांचा चाळ व दिलखेचक अदा डोळ्यासमोर चटकन येतात. लावणीने अख्ख्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून करमणूक केलेली आहे. अलीकडे समारंभात, लाइव्ह ऑर्केस्ट्रामुळे लावणीची मागणी कमी असल्यामुळे लावणी कलावंतांना काम मिळण्याचे प्रमाण कमी आहे. जे उपलब्ध आहे, त्यात मिळणाऱ्या अल्प मानधनामुळे लावणी कलावंतांच्या रोजगारावर गदा येत आहे. (Nashik crisis on employment of Lavani artist)

महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा आहे. लावणीचा सुवर्णकाळ सर्वांनी बघितला आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनीही लावणीच्या जोरावरच त्यांनी मोठी ओळख निर्माण केली आहे.

लीला गांधी, जयश्री गडकर, मधू कांबीकर, उषा चव्हाण, सुरेखा पुणेकर व मंगला बनसोडे अशा नृत्यांगणाने मनोरंजन केलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्री रेखा, ऊर्मिला मातोंडकर, प्रियांका चोपडा, दीपिका पदुकोण व माधुरी दीक्षित यांनी लावणी सादर करून मराठी मनांवर एक लोकप्रियतेचा ठसा उमटवला आहे.

मानधन तुलनेत खर्च अधिक

सध्या लावणी कलावंत अडचणीत आहे. नाशिकमध्ये एका लावणीच्या कार्यक्रमासाठी साधारणतः तीन ते चार हजार रुपये मानधन लावणी नृत्यांगनाला मिळते. एका शोमध्ये साधारण तीन ते चार नृत्य सादर केले जातात. मात्र नाशिक शहरात जर कार्यक्रम असेल तर परवडते. मात्र नाशिक सोडून जर बाहेर असेल तर प्रवासात जाणारा वेळ, नंतर शोमध्ये सादरीकरण मेकअप असा सर्वच खर्च असल्यामुळे मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत खर्च अधिक होतो. त्यामुळे बाहेर समारंभाला जाणे परवडत नाही.

Lavani Artist
Latest Marathi News Update: मुंबई : ताडदेवमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला आग; 5 अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

स्थानिक कलाकार वंचित

विशेष करून कोरोनानंतर लावणीला ओहोटी आली आहे. सध्या कराओकेमुळे लाइव्ह ऑर्केस्ट्राची मागणी कमी, त्यामुळे आपोआपच लावणी कलाकराना बोलाविले जात नाही. त्यामुळे या क्षेत्राकडे नवीन लावणी कलाकार येण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले. जयंती, उत्सव, यात्रा येथे लावणी कलावंताची मागणी आहे. मात्र तिथेही लावणी आर्टिस्ट काही ठिकाणी मुंबई, पुण्याहून बोलविल्या जातात. त्यामुळे स्थानिक लावणी कलाकारांचा हक्काचा रोजगार जातो.

लावणी कलाकाराची मागणी सध्या कमी झालेली आहे. यासाठी मुख्य कारण जी पार्टी आमंत्रित करणारी आहे, त्यांचे बजेट हे मुख्य कारण दिले जातं. लावणीपेक्षा हिंदी गाण्यांना अधिक पसंती दिली जाते. लावणी या महाराष्ट्रातील प्रमुख लोककलेचे जतन होण्यासाठी शासनाने कलावंतांना पाठबळ द्यावे.- मनीषा नागपुरे, लावणी कलावंत

"लावणीतलं खरं स्वरूप व त्यामधील कला ही समजून घेण्याची आवश्यकता आहे. लावणी कलावंतांसाठी सध्या नाशिकमध्ये मागणी कमी आहे, हे वास्तव आहे. प्रतिभा, कलागुण अंगी असतानाही त्या तुलनेत मानधन कमी मिळते. लावणी कलेचे जतन होण्यासाठी समाजातील घटकांनी पुढे यावे."- कविता बनसोडे, लावणी कलावंत

Lavani Artist
Lok Sabha Election 2024: 4 जूननंतर राहुल गांधींचं भवितव्य काय असेल? काँग्रेससाठी लोकसभा निवडणूक निर्णायक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com