Nashik Water Scarcity : पाऊस न झाल्यास पुढील आठवड्यात पाणीकपात; संकट गडद

Nashik News : जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे क्षेत्र असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात पाऊस नसल्याने त्याचा परिणाम नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे.
Water Scarcity
Water Scarcityesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे क्षेत्र असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात पाऊस नसल्याने त्याचा परिणाम नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे. पुढील आठवड्यात पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपात लागू केली जाण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. (Water cut next week if no rain)

शहराला गंगापूर धरणा व मुकणे या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी अपुरा पाऊस झाल्याने मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहरासाठी दरवर्षी आरक्षित केल्या जाणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली. ६,१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी महापालिकेने नोंदवली होती.

मात्र गंगापूर, दारणा व मुकणे या तीनही धरणातून ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. जवळपास ७८६ दशलक्ष घनफूट पाणीकपातीमुळे तब्बल अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली.

मात्र सर्वाधिक पर्जन्यमानाचे क्षेत्र असलेले इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. सद्यःस्थितीत शहरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यापैकी ५४८ दशलक्ष घनफूट एवढेच पाणी शिल्लक आहे. (latest marathi news)

Water Scarcity
Pune Water Supply : पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळित; तीन दिवसांत पाण्याचे वेळापत्रक कोलमडले

दैनंदिन पाणी उपसा लक्षात घेता अठ्ठावीस दिवस पुरणार आहे. त्यामुळे इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात वळसा पाऊस पडून गंगापूर धरणात पाणीसाठा न झाल्यास आठवड्यातून एक ते दोन दिवस पाणी कपात लागू करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

धरणातील आरक्षित पाण्याचा साठा (दलघफु)

धरण आरक्षण पाणीउचल शिल्लक पाणीसाठा

गंगापूर ३,८०७ ३,३६४ ४३१

दारणा व मुकणे १,५०७ १,३९० ११७

---------------------------------------------------------------------------------

एकूण आरक्षण ५,३१४ ४,७५४ ५४८

Water Scarcity
Water Tanker : २५ जिल्ह्यांचा घसा कोरडाच;साडेतीन हजार टँकरने सुरू आहे पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.