Nashik Water Crisis : कळवण तालुक्यात खासगी टँकरने पाणीपुरवठा! विहिरी अधिग्रहणाच्या हालचाली

Water Crisis : एप्रिल महिन्यात सप्तशृंगगडावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात आज खासगी टँकरने पाणीपुरवठा करुन तहान भागवली जात आहे.
Base reached by Bhavani Pazar Lake at Saptshringgad.
Base reached by Bhavani Pazar Lake at Saptshringgad.esakal
Updated on

कळवण : आदिवासी कळवण तालुक्यातील यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात २६ गावे, ८ वाड्या अशा ३४ ठिकाणी, खासगी विहीर अधिग्रहण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल ते जून या तिसऱ्या टप्प्यात ३२ गावामध्ये व ४ वाड्यांमध्ये खासगी विहीर अधिग्रहण करण्याची उपाययोजना करण्याचे नियोजन असून, ७ गावांमध्ये विहीर खोल करण्याचे नियोजन आहे. एप्रिल महिन्यात सप्तशृंगगडावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात आज खासगी टँकरने पाणीपुरवठा करुन तहान भागवली जात आहे. (Nashik Water supply by private tanker in Kalwan taluka marathi news)

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तालुक्यातील ५१ गावे आणि १२ वाड्यापाड्यांमध्ये व सुळे सुकापूर आश्रमशाळेत पाणीटंचाई जाणवेल, असे चित्र आहे. गेल्या वर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी (४९८ मिमी) पाऊस झाल्यामुळे टंचाईच्या झळा बसणार आहे. सप्तशृंगगडावर फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवत असून, ग्रामस्थांना तीन दिवसांआड पाणी मिळत आहे. सध्या गडावर येणाऱ्या भाविकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून ट्रस्टच्या वतीने टँकर सुरु करण्यात आले आहे.

तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तीव्र झाला आहे. यंदा मोठ्या प्रकल्पासह लघुपाटबंधारे प्रकल्पामधील पाण्याची पातळी खालावली आहे. पश्‍चिम भागातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या एप्रिलमध्ये भेडसावणार आहे.

दरवर्षी उन्हाळा आला की पिण्याच्या पाण्यासाठी वाड्यावस्त्यांमधील नागरिकांना उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. तालुक्यातील बहुतांश हातपंप बंद आहेत. त्यामुळे काही वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

एक दिवसांआड पाणी

कळवणला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या गिरणा व बेहडा नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठल्याने शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

Base reached by Bhavani Pazar Lake at Saptshringgad.
Nashik Water Scarcity: नांदगावच्या घाटमाथ्यावर पाझरतलावात ठणठणाट! विहिरिंनी गाठला तळ, पाणीटंचाई तीव्र होणार

भवानी तलावाने गाठला तळ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलावाने तळ गाठला आहे. येत्या १७ एप्रिलपासून चैत्रोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे लाखो भाविक दर्शनाला येणार असून, पाण्याची व्यवस्था कशी करणार, असा प्रश्‍न येथील ग्रामस्थांना पडला आहे. ग्रामस्थांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, हॉटेल व्यावसायिक व लॉजिंग धारकांना हजार ते बाराशे रुपये देऊन टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

भुजल पातळी घटली

गेल्यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६३९ मिमी आहे. गेल्यावर्षी तालुक्यात ४९८ मिमी पाऊस झाला. त्यामुळे भुजल पातळीत वाढ न झाल्याने कळवण तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसणार आहे.

- टप्पा २ (जानेवारी ते मार्च) : खासगी विहीर अधिग्रहण करणे, २५ गावे ८ वाड्यांना विंधन विहीर घेणे, १५ नळ पाणीपुरवठा विहिरींची दुरुस्ती करणे.

- टप्पा ३ (एप्रिल ते जून) : खासगी विहीर अधीग्रहण, २५ गावे व ८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.

या गावांना पाणीटंचाई जाणवणार

हिंगवे, ढेकाळे, मोहनदरी, कातळगाव, चिंचपाडा, पुणेगाव, ककाणे, कुमसाडी, बिलवाडी, दरेभणगी, डालीआंबा, गोळाखाल, गोसराणे, साबळेपाडा, बेलबारे, सरलेदिगर, पुनर्वसनपाडा, खडकी, कन्हेरवाडी, सुळे व सुकापूर आश्रमशाळा, वडपाडा, तिऱ्हळ बु॥, तिऱ्हळ खुर्द, चिखलीपाडा, कुंडाणे (क), वंजारी, कोसूर्डे.

टंचाईग्रस्त गावे

कोसवण, ओतूर, ओझर, अंबिका ओझर, दह्याणे (ओ), सावकी (पाळे), वाडी बु॥, गोपाळखडी, वडाळेवणी, दरीपाडा, आमदर, रवळजी, कुंडाणे (ओ), देवळीकराड, पाळेपिंप्री, आठबे, हुंड्यामोख, निमोणपाडा, सप्तशृंगगड, शृंगारवाडी, जिरवाडे (ओ), बच्छाव वस्ती, बिलवाडी, मारुतीपाडा, नरुळ, तताणी अंबापूर, साकोरे.

Base reached by Bhavani Pazar Lake at Saptshringgad.
Nashik Water Crisis: तलाव आटल्याने येवलेकरांना 5 दिवसाआड पाणी! शहरात गढूळ पाणीपुरवठा, पाणीबाणीची स्थितीमुळे आवर्तनावर भिस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.