इगतपुरी : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून मुंबई-आग्रा महामार्गाची ओळख आहे. याच मार्गावर मुंबईसह राज्यातील विविध भागातील हौशी व निसर्ग पर्यटकांच्या आवडीचा कसारा घाट आहे. नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्यांना महामार्गालगत असणाऱ्या डोंगरावरून वाहणाऱ्या नैसर्गिक धबधब्यांजवळ वाहन थांबवून धबधब्यात भिजण्याचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून येथे हौशी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik Crowd of amateur tourists with vehicles on waterfalls)
गेल्या आठवडाभरापासून इगतपुरी शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागात संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने डोंगरांमधील लहान-सहान धबधबे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असून, हौशी पर्यटक धबधब्यांवर कुटुंबासोबत गर्दी करून वाहतूककोंडी करीत आहेत.
त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता असून, पोलिसांनी या हौशी पर्यटकांवर आवर घालण्याची मागणी होत आहे. दरम्यान, गेल्या १०-१५ दिवसांपूर्वी या भागात ५ ते ६ वाहनांचा एकाचवेळी विचित्र अपघात होऊन ९ जण जखमी झाले होते. पोलिसांनी येथे लावलेले बॅरिकेट्स बाजूला करून पर्यटक धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असून, पर्यटकांची वाहने येथे उभी राहत असल्याने येथे कोंडी होते.
कसारा घाटातील नाशिकहुन मुंबईकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यात ऐन वळणाच्या ठिकाणी मोठमोठे धबधबे असून, पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. धबधब्यांवरुन कोसळणाऱ्या पाण्याससोबत दरड कोसळण्याची शक्यता असल्याने यासाठी महामार्ग पोलिसांनी व रस्त्याच्या ठेकेदाराने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी अवजड वाहनचालक करीत आहेत. (latest marathi news)
पर्यटन विकासाला द्यावी चालना
कोकणाचे प्रवेशद्वार म्हणजे निसर्गाने नटलेल्या कसारा घाटात अनेक वळणावर पावसाळ्यात धबधबे निर्माण होत असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना धबधबे आपल्याकडे आकर्षित करतात. कसारा घाटातील रस्त्याच्या बाजूला माळशेज घाटाप्रमाणे विकास झाल्यास अनेक पर्यटक थांबतील. लहान धबधबे, बाजूला अशोका धबधबा अशी पर्यटनस्थळे असल्याने स्थानिक आदिवासी बांधवांना पर्यटकांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल.
"नाशिककडून येताना उतार असल्याने वाहने वेगात येतात. परंतु, येथे लहान वाहने दाटीवाटीने उभी असल्याने वाहनांवरील ताबा सुटल्यास मोठा अपघात होऊन जीवित्तहानी होऊ शकते. यासाठी येथे वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांनी मनाई करावी."
- देविदास घोडके, वाहनचालक, सिन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.