Nashik News : HAL च्या शिरपेचात'महारत्न'चा मुकुट! देशातील चौदावा उद्योग, संरक्षण क्षेत्रासाठी गौरव

Latest Nashik News : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभागाने एक्स प्लॅटफॉमवर ही माहिती जाहीर केली.
HAL
HALesakal
Updated on

ओझर : संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) मोठं यश मिळालं आहे. एचएएल'ला आता महारत्न उद्योगाचा दर्जा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभागाने एक्स प्लॅटफॉमवर ही माहिती जाहीर केली. (crown of Maharatna to HAL)

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखालील आंतर मंत्रालयीन समिती (आयएमसी), कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च समिती या दोन उच्चस्तरीय समित्यांनी एचएएलला अपग्रेड करण्याची शिफारस केली होती. एचएएल संरक्षण उत्पादन विभागांतर्गत (डीओडीपी) काम करते.

२०२३-२४ आर्थिक वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल २८,१६२ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ७,५९५ कोटी रुपये होता. महारत्न दर्जा मिळालेली देशातील १४ वी सरकारी कंपनी असून हे यश मिळवल्यानंतर तिची स्वायत्तता आणि आर्थिक बळही वाढणार आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये ऑइल इंडियाला महारत्न दर्जा मिळाला होता.

HAL
Yogendra Yadav : मते कापणाऱ्यांपासून सावध व्हा : योगेंद्र यादव

एचएएल आणि ऑइल इंडिया व्यतिरिक्त भेल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) , कोल इंडिया, गेल, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल), इंडियन ऑइल, एनटीपीसी, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, सेल, आरईसी आणि पीएफसी या महारत्नांच्या यादीत एचएएल'चा समावेश झाला आहे. नवरत्न एचएएल आता महारत्न झाल्याने नाशिकच्या एचएएल कामगार संघटनेचे सरचिटणीस संजय कुटे, अध्यक्ष अनिल मंडलिक यांनी एचएएल कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या बळावरच शक्य झाल्याचे सांगितले.

महारत्नचा निकष

महारत्नाचा दर्जासाठी तीन वर्षांत सरासरी वार्षिक उलाढाल २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी. वार्षिक निव्वळ संपत्ती १५ हजार कोटीपेक्षा जास्त तर सरासरी वार्षिक निव्वळ नफा ५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा. सरकारच्या पाठिंब्याशिवाय काम कराव. असे निकष आहेत.

HAL
Dipa Karmakar Retirement : दीपा कर्माकरने निवृत्तीचा निर्णय का घेतला? वाचा प्रशिक्षकांची Exclusive मुलाखत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.