धार्मिक पर्यटनाकडे नाशिककरांचा कल

केरळ, राजस्थान, गोव्याला पसंती
धार्मिक पर्यटन
धार्मिक पर्यटनsakal
Updated on

नाशिक : कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला झुगारत गेल्या पावणेदोन वर्षांपासून स्वतःला घरात कोंडून ठेवलेल्या नागरिकांनी आता दिवाळीचे निमित्त करून पर्यटनासाठी बाहेर पडण्यास सुरवात केली आहे. परदेशातील कोरोना बंधनामुळे देशांतर्गत पर्यटनाकडे अधिक कल असून त्यात केरळ, राजस्थान व गोव्याला अधिक पसंती मिळत आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांचा कल धार्मिक पर्यटनाकडे असून, धार्मिक व मनोरंजनाचा मेळ पर्यटनाच्या माध्यमातून साधला जात आहे.

गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट निर्माण झाली. पुढील चार महिने सातत्य राहिल्याने टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्या घटत गेली. यावर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना होता की नाही, अशी परिस्थिती होती. जानेवारीअखेरपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जोर धरत मागील विक्रम मोडीत काढले. मेअखेरपर्यंत कोरोना दुसरी लाट होती. कोरोना संसर्गामुळे देशभर लॉकडाउन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.

धार्मिक पर्यटन
Farmers Protest: 29 नोव्हेंबरला शेतकरी संसदेकडे कूच करणार

पावणेदोन वर्षे कोरोना लॉकडाउनमध्ये गेल्याने आता कोरोना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी संभावित तिसऱ्या लाटेला न जुमानता पर्यटक दिवाळी सुटीचे निमित्त करून घराबाहेर पडू लागले आहेत. दोन वर्षात ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकले गेले होते. आता पर्यटकांकडून विचारणा होवू लागल्याने पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येताना दिसतं आहे.

देशांतर्गत पर्यटनाला अच्छे दिन

देशांतर्गत पर्यटनाला चांगले दिवस आले आहे. केरळ, राजस्थान पाठोपाठ मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पर्यटनाला पसंती मिळत आहे. धार्मिक पर्यटनाकडे अधिक कल दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.