Nashik Cyber Crime : शेअर मार्केट व स्टॉक ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी पुन्हा शहरातील सहा जणांना तब्बल ९३ लाखांना गंडा घातला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर भामट्यांच्या या फसव्या आमिषांना भुलून आत्तापर्यंत २० कोटीपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक झालेली आहे. तर दुसरीकडे सायबर पोलिसांच्या हाती सायबर भामटा लागत नसल्याने असे प्रकार सातत्याने होत आहेत. (Extorting 93 lakhs by falling prey to stock market)