Nashik Cyber Crime: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे, पैसे भरा नाहीतर...म्हणत सायबर भामट्याने युवकाला घातला 10 लाखांना गंडा

Cyber Crime News : कारवाई टाळायची असेल तर तातडीने दिलेल्या अकांऊटवर पैसे पाठविण्याची धमकी देत सायबर भामट्याने शहरातील एका युवकाला तब्बल १० लाखांना गंडा घातला आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik MD Drugs Crime : परदेशात पाठविलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्जस्‌ सापडले आहे. त्यामुळे कठोर स्वरुपाची कारवाई केली जाईल. कारवाई टाळायची असेल तर तातडीने दिलेल्या अकांऊटवर पैसे पाठविण्याची धमकी देत सायबर भामट्याने शहरातील एका युवकाला तब्बल १० लाखांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर भामट्यांनी गंडा घालण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. (Cyber ​​Crime MD drugs been found in your parcel cheated youth of 10 lakhs)

इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या २६ मार्च युवक त्यांच्या कामात व्यस्त असतांना सायबर भामट्याने ८१२५४३२०८३ या मोबाईल क्रमांकावरुन त्यास संपर्क साधला होता. त्यावेळी सायबर भामट्याने, आपण फेडेएक्स कुरिअर कस्टमर केअरचा सिनिअर एक्झक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगत आपण तैवान, थायलंड येथे पाठविलेल्या एका पार्सलमध्ये मुंबई गुन्हेशाखा आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकास एमडी ड्रग्ज, आधारकार्ड, कपडे, शूज सापडल्याचे सांगितले.

यावेळी तक्रारदार युवकाने मात्र, मागील तीन ते चार महिन्यांत आपण कोणतेही कुरिअर वा पार्सल पाठविलेले नसल्याचे सांगितले असता, संशयित सायबर भामट्याने त्यास गंभीर कारवाईची भिती दाखवून धमकावले. जर, एमडी ड्रग्जचे हे प्रकरण मिटवायचे असेल, तर एनसीबी व पोलिसांच्या 00000039575952162 (SBIN0011789) या क्रमांकाच्या बँक खात्यात १० लाख ४५ हजार रुपये बळजबरीने भरण्यास भाग पाडले.

त्यानंतर याप्रकरणाची युवकाने सखोल चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने तातडीने नाशिक सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Cyber Crime
Weight Loss Drugs: वजन कमी करणारी बनावट औषधे विकणाऱ्या 250 वेबसाइट बंद, 'या' संस्थेकडून मोठी कारवाई

गंडविण्यासाठी एक ना अनेक क्लृप्त्या

सायबर भामट्यांकडून समोरील व्यक्तीला गंडा घालण्यासाठी एक ना अनेक क्लृप्त्या, नवनवीन बहाणे वापरले जात आहेत. तुमचे मोबाईल सीम कार्ड दहशतवादी कारवायांसाठी वापरले गेल्याचे सांगत, कारवाईच्या नावाखाली धमकावले जाणे, तुम्ही कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याने अटक होईल, अशी भिती दाखविली जाते.

तुम्ही केलेल्या कुरिअरमध्ये दहशवादाशी निगडित बाबी, पुरावे, तुमचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एमडी ड्रग्ज, पिस्तूल सापडले आहेत. सीबीआय, एनसीबी, ईडी, क्राईम ब्रान्च तुमच्या घरी येऊन अटक करतील, त्यापूर्वीच सेटलमेंट करा, अशा धमक्या दिल्याने समोरील व्यक्ती घाबरून या सायबर भामट्यांना बळी पडतात आणि आर्थिक गंडा घातला जातो आहे.

Cyber Crime
Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६४ कोटींची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.