Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांकडून दोघांची साडेपंचवीस लाखांची फसवणूक

Latest Crime News : शेअर मार्केटमध्ये जादा पैसे दाखवत एकाची साडेसतरा लाखांची फसवणूक केली. तर दुसऱ्या घटनेत बॅंकेच्‍या बनावट मोबाईल ॲपच्‍या सहाय्याने आठ लाख रुपये लांबविल्‍याचे उघडकीस आले आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांत साडेपंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये जादा पैसे दाखवत एकाची साडेसतरा लाखांची फसवणूक केली. तर दुसऱ्या घटनेत बॅंकेच्‍या बनावट मोबाईल ॲपच्‍या सहाय्याने आठ लाख रुपये लांबविल्‍याचे उघडकीस आले आहे. (Two half cheated by cyber criminals)

पहिल्‍या घटनेत शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये जादा नफा कमविण्याचे आमिष दाखवत १७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला. साहेबराव त्रंबक निकम (रा. नांदूर लिंक रोड, आडगाव) यांनी याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्‍यानुसार ऑगस्‍टमध्ये त्‍यांना व्‍हॉट्‌सअप ग्रुपमधील प्रणिता जोशी नामक व्‍यक्‍तीने संपर्क साधत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये नफा मिळविण्याचे आमिष दाखविले. वेगवेगळ्या बँक खात्‍यांमध्ये १७ लाख ५० हजार रुपये भरायला लावले. त्‍यानंतर संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्‍याने आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच त्‍यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. (latest marathi news)

Cyber Crime
Nandurbar Cyber Crime : तळोद्यातील शेतकऱ्याची ऑनलाइन फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांकडून आवाहन

दुसऱ्या प्रकारात सायबर भामट्यांनी युनियन बँकेचा लोगो असलेली एपीके फाइल अर्थात बनावट ॲप पाठवून त्‍याआधारे आठ लाखांची फसवणूक केली. मूळच्‍या बोरिवली (मुंबई) व सध्या समर्थनगर येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या निशा बिजॉय चिरॅमल असे फसवणूक झालेल्‍या महिलेचे नाव आहे.

त्‍यांना भामट्यांनी ९ ऑगस्‍टला सकाळी पावणे आठच्‍या सुमारास व्‍हॉट्‌सअपद्वारे संपर्क साधत युनियन बँकेचा लोगो असलेली एपीके फाइल पाठवली. त्‍यावर चिरॅमल यांनी क्‍लिक केले असता, त्‍यांच्‍या युनियन बँकेच्‍या स्‍टाफ ओव्‍हर ड्राफ्ट अकाउंटमधून दोन लाखांचे एकूण चार व्‍यवहार असे एकूण आठ लाख रुपये भामट्यांनी काढले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्‍यावर त्‍यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Cyber Crime
Jalgaon Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावे 11 लाखांची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.