Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांनी 70 लाखांना गंडविले! दोन वेगवेगळ्या घटनांचे गुन्‍हे दाखल

Latest Cyber Crime News : यापैकी एका प्रकरणात शेअर बाजारात जादा परताव्‍याचे आमिष दाखवत फसविले. तर दुसऱ्या घटनेत ‘व्‍हर्च्युअल अरेस्ट’ करण्यासाठी धमकावत पैसे उकळल्‍याचे समोर आले आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून लक्ष्य करताना फसवणुकीचे प्रकार घडविले जात आहेत. नुकताच घडलेल्‍या दोन वेगळ्या घटनांमध्ये भामट्यांनी एकूण सत्तर लाखांना गंडविल्‍याचे समोर आले आहे. यापैकी एका प्रकरणात शेअर बाजारात जादा परताव्‍याचे आमिष दाखवत फसविले. तर दुसऱ्या घटनेत ‘व्‍हर्च्युअल अरेस्ट’ करण्यासाठी धमकावत पैसे उकळल्‍याचे समोर आले आहे. (Cyber ​​criminals cheated 70 lakhs)

Cyber Crime
Ahmednagar Cyber crime : सायबर गुन्हेगारांकडून मतदार ‘टार्गेट’ घर क्रमांक दुरुस्तीच्या नावाखाली माहितीची मागणी

पहिल्‍या घटनेत द्वारका परिसरातील ५९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार भामट्यांनी १३ सप्टेंबरला त्‍यांना २३ लाख रुपयांचा गंडविले. दिल्ली पोलिस, सीबीआय, ट्राय विभागातून बोलत असल्याचे भासवीत संशयितांनी वृद्ध महिलेला घाबरविले. मनी लॉड्रींगच्‍या प्रकरणात त्‍यांचा सहभाग असल्‍याचे सांगत गुन्‍ह्‍यात अटक करण्याचे सांगत भीती निर्माण केली. अटक टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने २३ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला.

दुसऱ्या घटनेत गंगापूर रोडवरील महिला डॉक्टरसह इतर चौघांना भामट्यांनी जादा परताव्‍याचे आमिष दाखवत ४६ लाख ४७ हजार ३४८ रुपयांना गंडविले. सायबर भामट्यांनी २२ नोव्हेंबर २०२३ ते २६ जुलै २०२४ या कालावधीत ही फसवणूक केली. शेअर बाजारात जादा परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवत पाच जणांकडून भामट्यांनी ४६ लाख रुपये उकळले. अखेर फसवणूक होत असल्‍याचे लक्षात घेता, सायबर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे.

Cyber Crime
Nashik Cyber Crime : शेअर मार्केटच्या आमिषाला भुलून 93 लाखांना गंडा! अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.