Nashik Cyber Fraud : मनी लाँड्रिंगचा धाक दाखवत ज्‍येष्ठास 7 कोटींना फसविले; सायबर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल

Cyber Fraud : आधारकार्डवरून संशयास्‍पद आर्थिक व्‍यवहार झाल्‍याचे भासवत व मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून ऐंशीवर्षीय ज्‍येष्ठ नागरिकास भामट्यांनी तब्बल सात कोटी रुपयांना गंडविले.
Cyber Fraud
Cyber Fraudesakal
Updated on

Nashik Cyber Fraud : आधारकार्डवरून संशयास्‍पद आर्थिक व्‍यवहार झाल्‍याचे भासवत व मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून ऐंशीवर्षीय ज्‍येष्ठ नागरिकास भामट्यांनी तब्बल सात कोटी रुपयांना गंडविले. आपली आर्थिक फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर संबंधितांनी सायबर पोलिस ठाणे गाठत संशयितांविरोधात गुन्‍हा दाखल केला. यानंतर फसवणूक रक्‍कम सहा कोटी ९० लाख ८० हजारांपैकी सुमारे तीन कोटींचे व्‍यवहार पोलिसांनी गोठविले आहेत. (7 Crore cheated old age by showing fear of money laundering )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.