Nashik Cyber Fraud : फसव्या प्रलोभनांना भुलले अन्‌ गमावले 65 लाख; टास्कची स्कीम देत सायबर भामट्यांनी घातला गंडा

Cyber Fraud : ऑनलाईन पार्टटाईम जॉब अन्‌ ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून बेरोजगारांना नेहमीच गंडा घातला जातो.
Cyber Fraud
Cyber Fraudesakal
Updated on

Nashik Cyber Fraud : ऑनलाईन पार्टटाईम जॉब अन्‌ ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून बेरोजगारांना नेहमीच गंडा घातला जातो. परंतु शहरातील बांधकाम व्यावसायिक, नोकरदारांना ऑनलाईन टास्क देत कमी वेळेत भरपूर आर्थिक परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ६५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Unemployed people are cheated by 65 lakh in lure of online tasks )

पंकज मगन धामणे (रा. नवश्या हाईटस्, कर्मयोगी नगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच, याच गुन्ह्यात फसवणूक झालेले दहा जण हे व्यावसायिक, नोकरदार आहेत. जानेवारी २०२३ मध्ये तक्रारदारांना त्यांच्या व्हाट्सअॅप, टेलिग्राम आयडीवर सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या मोबाईल आयडींवरुन पार्टटाईम जॉब, वर्क फ्रॉम होम या नवीन स्कीम लॉन्च केल्याचे सांगत, यात कमीतकमी कालावधीत घरबसल्या जादा परताव्याचे प्रलोभने दाखविली.

या फसव्या स्कीमला धामणे यांच्याप्रमाणे दहा जण भुलले आणि त्यांनी त्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. संशयित सायबर भामट्यांनी अकरा तक्रारदारांना स्कीमनुसार कमी जोखमीचे टास्क परंतु चांगल्याच परताव्याची स्कीम दिली. त्यानुसार, टास्क पूर्ण केल्याने अनेक तक्रारदारांच्या बँक खात्यात संशयितांकडून २००, ५०० व १००० रुपयांचा परतावा ‘क्रेडिट’ झाला. त्यामुळे तक्रारदारांचा सायबर भामट्यांवर विश्वास बसल्याने त्यांनी परताव्याला भूलुन आणखी आर्थिक गुंतवणूक केली होती.

Cyber Fraud
Cyber fraud: मुल होत नसलेल्या महिलेला गर्भवती करा अन् बक्षीस मिळवा; बेरोजगार तरुणांच्या पडल्या उड्या!

टास्कने साधला निशाना

ऑनलाईन टास्क आणि रिव्ह्यु करण्यासाठी सायबर भामट्यांनी तक्रारदारांचा विश्वास संपादन करीत, त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळे अॅप व लिंक पाठवून ते क्लिक करण्यासह खासगी कंपन्यांचे रिव्ह्यूव्ह आणि रेटींगचे गुण देण्याचे टास्क दिले. सुरवातीला यात तक्रारदारांना संशयितांना चांगला परतावा दिला. त्यानंतर सायबर भामट्यांनी तक्रारदारांना जादा गुंतवणुकीवर अधिकचा परतावा देण्याचे अमिष दाखविले.

त्यामुळे तक्रारदारांमधील काहींनी २० लाख, १५ लाख, १० लाख, ५ लाख अशा रकमेची गुंतवणूक केली. मात्र, सायबर भामट्यांनी गुंतवणुकीपेक्षा तीन ते चारपट अधिकचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तक्रारदारांना तब्बल ६५ लाख ६५ हजार ८८१ रुपयांची फसवणूक केली आहे.

''ऑनलाईन जॉब, टास्क, रिव्ह्यु असे आमिष दाखविण्याचा प्रकार खोटे असतात. या गुन्ह्यासंदर्भात तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू असून नागरिकांनी अशा आमिषांना फसू नये. कोणत्याही अनोळखी लिंकला रिप्लाय देऊ नये. प्रलोभनांना बळी पडूनच अशी फसगत होत असते. सतर्कता बाळगावी. शंका असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.''- रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर सायबर पोलीस ठाणे.

Cyber Fraud
Nashik Cyber Fraud: सोन्यात गुंतवणूक करणे पडले महाग; सायबर भामट्याने घातला 43 लाखांना गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.