Nashik Police : अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा! सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर

Nashik Police : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे.
nashik lok sabha election
nashik lok sabha electionesakal
Updated on

Nashik Police : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी नेते-कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचाही वापर केला जातो आहे. मात्र, आचारसंहितेचा भंग आणि आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास संबंधित ग्रुप ॲडमिन व सदस्यांविरोधात गुन्हा दाखल होऊन कारवाईला सामोरे जावे लागू शकते. यासाठी सायबर सेलकडून सोशल मीडियावर बारकाईने ‘वॉच’ ठेवला जात असून त्यासाठी स्वतंत्र टीम काम करते आहे. ( Cyber ​​police keep watchful eye on social media due to election)

त्यामुळे ग्रुप ॲडमिनसह सोशल मीडियावर वावरणार्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होते आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. यावेळी प्रचारासाठी सोशल मीडियाचाही वापर वाढला असून मोठ्या खुबीने प्रचार केला जातो आहे. परंतु, आचारसंहितेचा भंग व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून आचारसंहितेचा भंगही या माध्यमातून केला जाऊ शकतो.

यासाठी शहर आणि, ग्रामीण पोलीसांच्या, सायबर पोलिसांच्या विशेष पथकाकडून सोशल मीडियावर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासाठी सायबर सेलमध्ये स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकाकडून सोशल मीडियावर ‘सर्चिंग’ करून राजकीय स्वरुपाच्या संदेशांवर करडी नजर ठेवली जात आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी व नागरिकांमार्फत संदेश, पोस्टर व्हारयल केले जाऊ शकतात. (latest marathi news)

nashik lok sabha election
Nashik Police : रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक ‘ॲक्शन’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आक्रमक

त्यावर पोलिसांची करडी नजर आहे. निवडणूक आयोगानेही यंदा सोशल मीडियासाठीही नियमावली जारी केली असून, आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षात घेण्याचे आवाहन पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना केले आहे. तसेच, पोलिसांनी सायबर गस्तही वाढविली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश वा पोस्टर व्हायरल केल्यास यासंदर्भात शहर-ग्रामीण सायबर पोलिसांकडून ग्रुप ॲडमिनसह सदस्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

सावधगिरी बाळगा

- सोशल मीडियासाठीही आचारसंहिता लागू

- आक्षेपार्ह, बदनामीकारक संदेश/पोस्टर व्हायरल करू नये

- समाज माध्यमांचा वापर प्रचारासाठीच करा

- आक्षेपार्ह संदेश व्हायरल न करता पोलिसांना कळवा

- समाजमनात तेढ निर्माण होऊन असे संदेश टाळा

''निवडणूक काळात सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. आचारसंहितेचा भंग व आक्षेपार्ह संदेश व्हायरल होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. अन्यथा संबंधितांविरोधात सायबर कलमान्वये कारवाई केली जाईल.''- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक.

nashik lok sabha election
Nashik Police : दत्तक गुन्हेगारांच्या अंमलदारांना दणका! पोलीस उपायुक्तांची कारवाई; अंबडच्या चौघांवर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.