Nashik Cyber Police : दंगली रोखण्यासाठी नाशिक पोलिसांची सोशल मीडियावर 'सायबर गस्त'; वापरणार विशेष सॉफ्टवेअर

नाशिकमधील सायबर पोलिसांनी आता 'डिजिटल गस्त' वाढवली आहे.
Nashik Cyber Police Software
Nashik Cyber Police SoftwareeSakal
Updated on

काही दिवसांपासून सोशल मीडियावरील पोस्टमुळे समाजातील तेढ वाढताना दिसून येत आहे. काही वेळा अनावधानाने, तर काही वेळा समाजकंटकांकडून जाणूनबुजून आक्षेपार्ह पोस्ट केल्या जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक सायबर पोलिसांनी हायटेक पर्याय निवडला आहे.

नाशिकमधील सायबर पोलिसांनी आता 'डिजिटल गस्त' वाढवली आहे. यासाठी त्यांनी एक विशेष सॉफ्टवेअर तयार केलं आहे. या माध्यमातून हे पोलीस आता सोशल मीडियावर २४ तास लक्ष ठेऊन असणार आहेत.

Nashik Cyber Police Software
Social Media Precaution : सावधान! सोशल मीडियावर अतिउत्साहाने व्यक्त होऊ नका.... नाहीतर

राज्यातील पहिलाच प्रयोग

अशा प्रकारचं सॉफ्टवेअर वापरण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. जातिवाचक पोस्ट, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, दंगलीच्या पोस्ट अशा पोस्ट शेअर होण्यापासून वेळीच रोखून पुढे होणारं नुकसान टाळण्यासाठी हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. स्मार्ट सिटी कॉर्परेशनच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर नाशिक पोलिसांना देण्यात आलं आहे.

कीवर्ड आणि हॅशटॅगची मदत

एखाद्या व्यक्तीच्या पोस्टमधील शब्द - म्हणजेच कीवर्ड आणि त्या पोस्टमधील हॅशटॅग यांच्या माध्यमातून पोस्ट ट्रॅक करण्यात येणार आहेत. या माध्यमातून पोस्ट केलेला मजकूर सकारात्मक आहे की नकारात्मक, यामुळे दंगलीसारख्या घटना घडू शकतात का, हे तपासण्यात येणार आहे. एकाच वेळी नऊ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे सॉफ्टवेअर लक्ष ठेऊ शकणार आहे.

पोस्ट लाईक करणंही धोक्याचं

वादग्रस्त पोस्टना कोण लाईक, कमेंट आणि शेअर करत आहे याकडेही पोलिसांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे अशा पोस्ट तुम्ही लाईक करत असाल, तरीही तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी या सॉफ्टवेअरची खरेदी केली असून, त्याचा वापरही सुरू करण्यात आला आहे.

Nashik Cyber Police Software
The Facebook Files : सोशल मीडिया सुधारलं नाही तर लाखो लोकांचा जाईल बळी; मेटाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर इशारा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.