सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण, बेहुडणे, निंबारपाडा, देवीपाडा, फणसपाडा, चुली (उ) या पाच ते सहा गावांना मंगळवारी (ता. १४) चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला. त्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली, तर आंबा पिकाची मोठ्या प्रमाणात गळ झाल्याने मोठे नुकसान झाले. गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला वळिवाच्या पावसाने धुमाकूळ घातला. (Cyclone damage to villages in Surgana taluka)
रविवारी (ता. १२) रात्री नांदगाव तालुक्याला झोडपल्यानंतर मंगळवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे पत्रे उडाले. डांगसेवा मंडळ शिक्षण संस्थेच्या येथील विद्यार्थी वसतिगृह व अकरावी, बारावीच्या वर्गखोल्यांवरील पत्रे उडाले.
उंबरठाण येथील गोटीराम देशमुख यांच्या घराचे पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले. ठाणगाव, बाऱ्हे, आंबुपाडा बे, झगडपाडा, वांगण परिसरालाही चक्रीवादळाचा फटका बसला. (latest marathi news)
दरम्यान, बेहुडणे येथील शेतकऱ्यांच्या आंबा पिकाची गळ झाली. निंबारपाडा येथील गंगाजी महाले, बाबूराव महाले, दिनेश महाले, नारायण महाले, ताराचंद महाले, केशव महाले यांच्या आंबा फळबागेचे नुकसान झाले.
हरसूल व तोरंगण परिसरातही पावसाने हजेरी लावली. तोरंगण येथे वादळाने अनेक घरे व शाळांचे पत्रे उडाले. निफाड, कसबे सुकेणे, सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात वळिवाचा पाऊस झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.