D.Ed Admission : डी.एड. प्रवेश अर्जासाठी 18 जूनपर्यंत मुदत

Nashik News : डी. एड. अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीतून कुठल्‍याही शाखेतील विद्यार्थ्याला प्रवेश अर्ज भरता येईल.
Admission
Admission esakal
Updated on

Nashik News : डीएड अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता अर्ज करण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदत दिली देण्यात आली असून १५ जुलैपासून अध्ययन प्रक्रियेस सुरवात होईल. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. यामध्ये डी.एड. अभ्यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेचा देखील सोमवार (ता.३) पासून श्रीगणेशा झाला आहे. (D. Ed Deadline for admission application is June 18)

दरम्‍यान डी. एड. अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीतून कुठल्‍याही शाखेतील विद्यार्थ्याला प्रवेश अर्ज भरता येईल. खुल्या संवर्गात किमान ४९.५ टक्के आणि राखीव संवर्गात किमान ४४.५ टक्के गुण विद्यार्थ्यास असणे आवश्‍यक आहे. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

नाशिक जिल्ह्यात अनुदानित स्‍वरुपातील पाच मराठी माध्यमाच्या महाविद्यालयात २१०, एकमेव उर्दू माध्यमाच्या महाविद्यालयात ५० जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध असतील. विनाअनुदानित महाविद्यालयात इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी ३ महाविद्यालयांमध्ये तीनशे जागा उपलब्ध असतील.

मराठी माध्यमाच्या अकरा महाविद्यालयांमध्ये ५५० जागा असतील. विद्यार्थ्यांनी www.maa.ac.in या संकेतस्‍थळाला भेट देत अर्ज भरायचा आहे. सद्य:स्‍थितीत अर्जाची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत दिलेली आहे. (latest marathi news)

Admission
Nashik Police : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविल्यास कारवाई

जिल्ह्यातील स्‍थिती

नाशिक जिल्ह्यामध्ये सहा अनुदानित तर १७ विनाअनुदानित असे एकूण २३ महाविद्यालये आहेत. अनुदानित महाविद्यालयात २६० आणि विनाअनुदानित महाविद्यालयात ८५० अशा प्रवेशासाठी एकूण एक हजार ११० जागा उपलब्ध असतील.

प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्‍या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३ ते १८ जून

दाखल अर्जाची पडताणी मुदत ३ ते १९ जून

गुणवत्ता यादीतील हरकतीचे निराकरण २४ जून

पहिल्या गुणवत्ता यादीची प्रसिद्धी २६ जून

यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत २७ जून ते १ जुलै.

Admission
Nashik Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये धनुष्य चालणार की मशाल पेटणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.