Dada Bhuse on Bhujbal : छगन भुजबळांचे वक्तव्य अशोभनीय; शरद पवार-भुजबळांच्या भेटीनंतर दादा भुसेंचे मत

Dada Bhuse on Bhujbal : राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाची ठिणगी पेटलेली असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणप्रश्‍नी शरद पवार यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांवर आरोप डागले आहेत.
Bhujbal's statement is indecent
Bhujbal's statement is indecentesakal
Updated on

Dada Bhuse on Bhujbal : राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाची ठिणगी पेटलेली असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणप्रश्‍नी शरद पवार यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांवर आरोप डागले आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यांना आरक्षणातील काही समजत नाही, असे उद्गार काढत पवारांची भेट घेतली असेल, तर ते अयोग्य असल्याचे मत पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केले. (Dada Bhuse opinion after Sharad Pawar Bhujbal meeting )

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचा निर्वाळाही त्यांनी या वेळी केला. आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिन कार्यक्रमासाठी पालकमंत्री भुसे सोमवारी (ता. १५) येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्य सरकारने यापूर्वीही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मराठा आरक्षण देताना ते कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता देण्याची भूमिका सरकारने आधीच जाहीर केली आहे. (latest marathi news)

Bhujbal's statement is indecent
Dada Bhuse : कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिले जाईल : दादा भुसे

त्या पार्श्वभूमीवर शासकीय नोकऱ्यांमध्ये तजवीजही केली जात आहे. अशा परिस्थीतीत या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या आहेत. राज्य शासनाच्या सर्वेक्षणानुसार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे सर्वेक्षण न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यातील काहीच कळत नाही, असे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीकाही भुसे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणे गैर

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे सरकारने यासंदर्भात घेतलेला निर्णय न्यायालयात टिकणारा आहे. त्यासाठी सर्वपक्षीय बैठकही घेण्यात आली आहे. त्याविरोधात काही लोक न्यायालयात गेले आहेत. मात्र न्यायालयाने त्याची मागणी मान्य न केल्याने राज्य सरकारने दाखल केलेली माहिती न्यायालयाच्या निर्देशानुसार असल्याचे स्पष्ट होत असल्याने भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांबद्दल असे बोलणे योग्य नसल्याचेही भुसे म्हणाले.

Bhujbal's statement is indecent
Nashik Dada Bhuse : अधिवेशन संपताच जिल्हा नियोजन समितीची बैठक : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.