Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
Nashik Dada Bhuse
Nashik Dada Bhuseesakal
Updated on

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी संदर्भात व शेतकऱ्यांचे थकीत कर्जाच्या बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली न करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे आंदोलनकर्त्यांसमवेत सहकार खात्याच्या अधिकारी सहकार सचिव आणि इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. (Dada Bhuse statement District Bank to meet soon against forced recovery)

शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी विकास संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, समिती सदस्य दिलीप पाटील आदी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री भुसे यांची भेट घेतली व निवेदन सादर केले.

निवेदनात आंदोलकांनी म्हटले आहे, की गत ४०५ दिवसांपासून नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्जवसुली बंद करावी व शेतकऱ्यांचे शेतजमिनीवर नावे लावणे बंद करून‌ लावलेली नावे काढून शेतकऱ्यांची पुनःश्‍च नावे लावण्यात यावीत. (latest marathi news)

Nashik Dada Bhuse
Nashik News : ‘एमडीएस’ प्रवेशासाठी नोंदणीची सोमवारपर्यंत मुदत; राज्‍यस्‍तरीय कोट्याची प्रक्रिया

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे या विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.

नाशिक जिल्हा बँकेचे ५५ हजार ५६७ थकबाकीदार शेतकऱ्यांकडील एक हजार ६७ कोटींचे कर्ज थकले असून, हे सर्व कर्ज माफ करावे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

Nashik Dada Bhuse
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.