Nashik Mumbai Highway : नाशिक-मुंबई वाहतूक कोंडी फुटणार! संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत 2 दिवसांत तोडगा

Nashik News : नाशिक-मुंबई महामार्गावर पुलांचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
Nashik Mumbai Highway
Nashik Mumbai Highway esakal
Updated on

Nashik News : नाशिक-मुंबई महामार्गावर पुलांचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळ, एमएसआरडीए, पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. (Nashik Mumbai Highway)

नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असल्याने मुंबईत पोचण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो. यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. व्यावसायिक संघटना, तसेच सर्वसामान्य नागरिकांची या विषयावर नाराजी आहे. राजकीय पक्षांनी देखील आंदोलनाचे इशारे दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांच्याशी माध्यमांनी शनिवारी (ता. २०) संवाद साधला.

महामार्गावर काही ठिकाणी पुलांचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगताना दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अवजड वाहनांना प्रवासासाठी वेळेचे बंधन लावण्यासह खड्डेही तातडीने बुजविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होऊन रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

चारशेपार आकडा झाल्यास देशाची घटना बदलणार व आरक्षणदेखील नष्ट होईल, असे मतदारांपर्यंत पोचविल्याने विरोधकांना काही समाजाचे एकगठ्ठा मतदान झाले. परंतु आता विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून चुकीचे आरोप होत आहे. मात्र यात त्यांना यश येणार नाही. चांगल्या कामांमध्ये बाधा आणण्याचे काम विरोधक करत असल्याचा भुसे यांनी आरोप केला. (latest marathi news)

Nashik Mumbai Highway
Nashik Police Transfer : बदल्यांनी ‘कहीं खुशी... कहीं गम’! बदल्या करून आयुक्त आठवडाभर सुट्टीवर

जरांगेंची भावना योग्यच

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे- पाटील उपोषणाला बसले आहेत. यावर बोलताना पालकमंत्री भुसे यांनी त्यांच्या भावना योग्य असल्याचे सांगितले. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असून, ती पूर्ण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या तेरा टक्के आरक्षणासंदर्भातही सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे. आरक्षणासंदर्भात एक खिडकी योजना राज्य सरकारने उघडली आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Nashik Mumbai Highway
Nashik News : भातशेती रुतली मजुरीच्या चिखलात; स्थानिक मजूर उद्योग कारखान्यात कार्यरत

बजरंगवाडी घटनेची चौकशी

नाशिक-पुणे महामार्गावर बजरंगवाडी येथे दगडफेकीच्या घटना घडल्या. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या तस्करीत पोलिसांचा सहभाग आढळून आला आहे. या संदर्भात पालकमंत्री भुसे यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना सरकारकडून आश्रय दिला जाणार नाही. त्याचबरोबर बजरंगवाडी प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

‘ती’ भेट अतिक्रमणाविषयी

इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे विधान परिषद निवडणुकीत मत फुटल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा असताना हिरामण खोसकर यांनी पालकमंत्री भुसे यांची आज भेट घेतली. परंतु खोसकर हे त्र्यंबक रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात भेटल्याचे स्पष्टीकरण भुसे यांनी दिले.

Nashik Mumbai Highway
Nashik Road Damage : महिनाभरातच निघाले रस्त्यावरचे डांबर; तळवाडे दिगर परिसरात संताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.