Nashik : पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची दररोज वीस कोटींची उलाढाल! रोख पेमेंट आणि चांगल्या भावामुळे जिल्हाभरातून विक्रीस पसंती

Latest Nashik News : टोमॅटोच्या खरेदी विक्रीतून दररोज वीस कोटी रूपयांची उलाढाल होत आहे. ही उलाढाल टोमॅटो उत्पादकांबरोबरच बाजार समितीच्या तिजोरीतही आर्थिक क्रांती घडविणारी ठरत आहे.
Distribution to farmers who sold tomatoes from Adat shop
Distribution to farmers who sold tomatoes from Adat shopesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सध्या टोमॅटोचा बोलबाला असून महाराष्ट्रात नव्हे देशात दररोज दोन लाख क्रेट टोमॅटोची आवक होत असलेली पिंपळगाव ही एकमेक बाजार समिती ठरत आहे. देशातील विविध राज्यासह बांगलादेशला टोमॅटोची मागणी पुरविण्याची धुरा सध्या पिंपळगाववर आहे.

वीस वर्षानंतर टोमॅटोला सरासरी बाराशे रूपये प्रतिक्रेट (वीस किलो) असा दमदार भाव मिळत आहे. टोमॅटोच्या खरेदी विक्रीतून दररोज वीस कोटी रूपयांची उलाढाल होत आहे. ही उलाढाल टोमॅटो उत्पादकांबरोबरच बाजार समितीच्या तिजोरीतही आर्थिक क्रांती घडविणारी ठरत आहे. (Daily turnover of 20 crores of tomatoes in Pimpalgaon market committee)

टोमॅटोची राजधानी अशी पिंपळगाव बसवंत बाजार समितीची ख्याती आशिया खंडात आहे. बेंगळुरू, गुजरात, नारायणगाव येथील टोमॅटोचा हंगाम महिन्याभरापूर्वीच आटोपला आहे. सध्या नाशिक जिल्हयात टोमॅटोचा हंगाम सुरू आहे. चोख वजन व रोख पेमेंट यामुळे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीलाच शेतकरी पहिली पसंती देतात.

त्यामुळे जिल्ह्याभरातून टोमॅटो विक्रीसाठी दुपारनंतर शेतकऱ्यांची वाहने पिंपळगाव बाजार समितीत येतात. दररोज तीन हजार जीप, ट्रॅक्टरमधून दोन लाख क्रेटची आवक होत आहे. बप्पर आवक असतानाही उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहारसह बांगलादेशमधून टोमॅटोची मागणी होत आहे. परराज्यातील सुमारे दोनशे व्यापारी बाजार समितीत टोमॅटो खरेदीसाठी आलेले आहेत.

दररोजची उलाढाल वाढतीच

पिंपळगाव बाजार समितीत दररोज दोन लाख क्रेटची आवक व मिळणारा सरासरी बाराशे रूपयांचा भाव पाहता प्रतिदिन वीस कोटी रूपयांची उलाढाल होत आहे. आडतदार रोख पेमेंटची शिस्त पाळण्यासाठी प्रयत्नशील असतात. बॅकांच्या सुट्ट्यासह काही अपवाद वगळता तातडीने पेमेंट देण्याची परंपरा आडतदार जपत आहे.

आडतदारांबाबत तक्रारी असल्यास सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे पेमेंटचे प्रश्‍न मार्गी लावले जात आहेत. सोन्याप्रमाणे टोमॅटोचे दर तेजीत असल्याने टोमॅटो उत्पादक यंदा मालामाल होत आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या तिजोरीत दररोज वीस लाख रूपयांचे बाजार शुल्क जमा होत आहे. (latest marathi news)

Distribution to farmers who sold tomatoes from Adat shop
Semi High Speed ​​Railway : पुणे- सेमी हायस्पीडसाठी मार्ग बदलावा लागणार : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

बहुप्रतिक्षेनंतर समाधानकारक दरामुळे शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरातील बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे. मंदीच्या कचाट्यातून बाजारपेठ बाहेर पडत असून सणासुदीमध्ये बहर आला आहे.

"शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून पिंपळगाव बाजार समितीचे कामकाज चालते. रोख पेमेंट व चोख वजन यामुळे पिंपळगाव बाजारसमिती बाबत शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी प्राधान्य देतात. दररोज दोन लाख क्रेटचा लिलाव करून त्यांची रक्कम देण्याचा प्रयत्न आडतदारांमार्फत होतो. चालढकल करणाऱ्या आडतदारांवर प्रशासनाकडून विचारणा केली जाते."

- आमदार दिलीप बनकर, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

"रोख पेमेंट देणाऱ्या आडतदारांमुळे शेतकरी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आणतात. रोख पेमेंटची शिस्त सर्व आडतदारांना बंधनकारक हवी. काही अडतदार रोख पेमेंटच्या अटी पाळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते."

- सुभाष होळकर, संचालक, अमर व्हेजिटेबल

"अतिपावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट आली आहे.तरीही मिळणार्या बाजारभावाने गत तीन-चार वर्षापासुन शेतकर्याची बिघडलेली आर्थिक घडी काहीशी सुधारली आहे.पिंपळगांव बाजार समितीत रोख पेमेंट मिळत असल्याने टोमॅटो विक्रीसाठी प्राधान्य देत असतो."

- अंबादास पूरकर, टोमॅटो उत्पादक, धोंडगव्हाण.

Distribution to farmers who sold tomatoes from Adat shop
Anil Deshmukh : ई-पीक पाहणीची अट रद्द करा आमदार अनिल देशमुख : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.