Nashik Dam Water Storage : नाशिक धरण समूहाचा साठा 41.96 टक्क्यांवर!

Nashik News : गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू असल्याने त्याचा परिणाम धरणातील जलसाठा वाढण्यावर झाला.
Dam Water Storage
Dam Water StorageSakal
Updated on

Nashik News : गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू असल्याने त्याचा परिणाम धरणातील जलसाठा वाढण्यावर झाला असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धारणा व मुकणे धरणात पाणीसाठा उपलब्ध होण्यास सुरवात झाल्याने नाशिककरांवरील जल संकट टळले आहे. (Dam Group stock at 41 percent)

गंगापूर धरणातील पाणीसाठा हा ५० टक्क्यांच्या वर पोचला आहे, तर गंगापूरसह काश्यपी व गौतमी धरण समूहाचा साठा ४१.९६ टक्क्यांवर पोचला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्यत्वे गंगापूर मुकणे व दारणा धरणामध्ये मागील वर्षी अपुरा पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून महापालिकेसाठी आरक्षणात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली.

जवळपास ५ हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. जवळपास ७८६ दशलक्ष घनफूट पाण्यात कपात करण्यात आल्याने नाशिककरांवरील जल संकट अटळ होते. त्यात जून महिन्यामध्ये अपुरा पाऊस झाल्याने जलसंकट अधिक गडद झाले. मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस पडण्यास सुरवात झाली. (latest marathi news)

Dam Water Storage
Nashik News : शहरात एकावर एक झोपड्या झोपडपट्यांच्या संख्येत कमालीची वाढ

रविवारपासून त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या परिसरामध्ये चांगला पाऊस होत आहे. त्याचा परिणाम म्हणून धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरवात झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कमी साठा असला तरी अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहे. श्रावणात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे.

सद्यःस्थितीत साठा (दलघफू)

गंगापूर धरण- २८१२

दारणा धरण- ४२६६

मुकणे धरण- २०११

Dam Water Storage
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.