Nashik News : धरणसाठा 79 कोटी 10 लाख लिटरने ‘समृद्ध’

Nashik News : राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत नाशिकमधील भारतीय जैन संघटना व मानव सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान राबविण्यात आले.
Dam stock by 79 crore 10 lakh litres increase
Dam stock by 79 crore 10 lakh litres increase esakal
Updated on

Nashik News : राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत नाशिकमधील भारतीय जैन संघटना व मानव सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील विविध धरणांतून ७९ हजार घनमीटर गाळ व माती उपसा केल्याने धरणांची क्षमता ७९ कोटी १० लाख लिटरने वाढली आहे. (Dam stock by 79 crore 10 lakh litres increase)

जिल्ह्यात जलसमृद्ध नाशिक अभियान १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत राबविण्यात आले. गाळामुळे ३७५ ते ४०० एकर जमीन सुपीक झाली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध स्वयंसेवी, औद्योगिक, बांधकाम, व्यापारी संघटनांनी पुढाकार घेत जलसमृद्ध नाशिक अभियान २०२४ राबविले.

जिल्ह्यातील आठ जलाशयांवर काम करून अभियान यशस्वी होऊ शकले. शासकीय विभागांसह लोकसहभागामुळे जिल्ह्यात ८१ ठिकाणी गाळ काढण्याचे काम झाले. जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी या अभिनायात बहुमूल्य योगदान दिले. (latest marathi news)

Dam stock by 79 crore 10 lakh litres increase
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक शहरात 10 केंद्रे

शहरातील विविध औद्योगिक, व्यावसायिक, व्यापारी, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील संस्था- व्यक्तींसह लोकवर्गणीतून अभियान राबविण्यात आले. यंदा प्रत्यक्ष काम करताना आलेल्या अडचणी व अनुभव लक्षात घेता त्या दूर करून आगामी वर्षात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम जिल्ह्यात उभे करण्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले आहे.

विभागनिहाय झालेले काम

विभाग................एकूण कामे.....काढलेला गाळ.....पाणीसाठा (कोटी लिटर)

मृद व जलसंधारण........४३................२,३८,६९३.............२३.८७

नाशिक पाटबंधारे.........२३.................३,०१,६९९.............३०.१७

मालेगाव पाटबंधारे........३....................६०,५००...............६.०५

लघु पाटबंधारे.................१२..................१,९०,०७१............१९.०१

एकूण..............................८१..................७,९०,९६४...........७९.१०

Dam stock by 79 crore 10 lakh litres increase
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेला शासनाकडून ‘आर्थिक टेकू’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.