नांदूर शिंगोटे : नांदूर शिंगोटे व परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने चांगलाच धुवा उडवला आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजेला पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास गुरुवारी सायंकाळी पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली त्यामुळे शेतामध्ये चांगल्या प्रकारे पिकांमध्ये पाणी साचले होते मात्र पावसाने थोडी उत्साहान दिल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत पावसाला पुन्हा सुरुवात झाली. (Damage to agricultural crops in Nandur Shingote area due to return rains in district )
रात्रभर पावसाने मोठी बॅटिंग केली त्यानंतर सकाळीच सहा वाजेला पावसाला सुरुवात झाली. सकाळी झालेल्या पावसाने अचानकपणे नद्या नाले उचलून वाहू लागले एक प्रकारे ढगफुटी झाली की काय असा प्रकार पाहावयास मिळाला. सकाळी नऊ वाजेला नद्यांना भरभरून पाणी वाहू लागले त्यामुळे परिसरामध्ये सर्वच ठिकाणी नद्यांना पूर आले व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये केलेल्या पिकांची पाहणी केली असता शेतामध्ये लावलेले लाल कांद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले दिसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्यातून पाणी बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला मात्र काल झालेल्या पावसामुळे व रात्री झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (latest marathi news)
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी उन्हाळा कांद्याची रोपे टाकलेली असून या पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांची उन्हाळ कांद्याची रोपे पीळ रोगाने बळी पडत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाच्या मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसानी झालेल्या आहे. अगोदरच कांदा पिके शेतकऱ्यांनी कशी तरी उभी केलेली आहे व त्यामध्ये रोजच पावसाच्या आगमन झाल्यामुळे कांदा पिके पिवळी पडू लागली आहे त्यामुळे कांदा पिकांना फवारणी करण्याचे कामही शेतकरी वर्ग सध्या करताना दिसत आहे. मात्र काल झालेल्या पावसामुळे लाल कांदा लागवड झालेली रोपे व लावण्यासाठी तयार होत असलेली उन्हाळ कांद्याची रोपे या पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सर्वत्रच नाराजीचा सुर दिसत आहे.
या झालेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांची लागवड झालेली कांदा पिके उध्वस्त होऊ पाहत आहे मात्र शेतकरी वर्ग निसर्गाच्या पुढे काहीही करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे. आज दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिलेले होते व पुनश्च पावसाच्या आगमन होण्याची स्थिती दिसत आहे त्यामुळे दिवसभर शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर दिसत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.