Nashik News : सिन्नर येथे वीज पडल्याने मंदिराच्या कळसाचे नुकसान! शेकडो पारव पक्षांचा गेला बळी

Latest Nashik News : वावी-शहा रस्त्यावर असलेल्या भोलेबाबा (महादेव) मंदिराच्या 111 फूट उंचीच्या कळसावर मध्यरात्री विज पडल्यामुळे कळसाला तडे जाऊन नुकसान झाले आहे.
Temple and dead birds
Temple and dead birdsesakal
Updated on

सिन्नर : मंगळवारी रात्री सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात विजांचे प्रचंड तांडव बघायला मिळाले. वावी-शहा रस्त्यावर असलेल्या भोलेबाबा (महादेव) मंदिराच्या 111 फूट उंचीच्या कळसावर मध्यरात्री विज पडल्यामुळे कळसाला तडे जाऊन नुकसान झाले आहे. या मंदिराच्या आश्रयाला असलेले शेकडो पारव पक्षी देखील या घटनेत मृत्युमुखी पडले. (Damage to temple due to lightning at Sinnar)

वावी शहा रस्त्यावर 111 फूट उंचीचा कळस असलेले भगवान महादेवाचे भोलेबाबा मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात रुद्राक्ष वृक्षाच्या हजारो झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराच्या परिसरात सतत पक्षांचा वावर असतो. गगनचुंबी कळसाच्या आश्रयाला शेकडो पारव पक्षांची घरटी आहेत.

दिवसभर भ्रमंती करणारे हे पक्षी रात्रीच्या वेळी मंदिरात आपल्या घरट्यांमध्ये आश्रयाला येत असतात. मंगळवारी रात्री परिसरात विजांच्या प्रचंड तांडवात पावसाला सुरुवात झाली. बुधवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. सकाळी दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना मृत पक्षांचा पडलेला खच बघायला मिळाला. (latest marathi news)

Temple and dead birds
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’च्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षाच; जामनेरला 2 हजारांवर अर्ज प्रलंबित

त्यामुळे मंदिराच्या कळसाकडे सर्वांचे लक्ष गेले असता वीज पडून कळसाची काही भागांची पडझड झाल्याचे आढळून आले. कळसाला ठीक ठिकाणी तरी देखील गेल्याचे नागरिकांनी सांगितले. मृत पक्षांची दुर्गंधी सुटू नये यासाठी परिसरातील रहिवाशांनी जमा करून त्यांची विल्हेवाट लावली.

Temple and dead birds
Nashik News: गौण खनिज निधीवरून आमदारांमध्ये रस्सीखेच! जिल्हा गौण खनिज विकास प्रतिष्ठानच्या 47 कोटी निधीसाठी 900 प्रस्ताव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.