Nashik Damaged Road: सुमार गुणवत्तेपुढे तंत्रज्ञान फिके; रस्ते दुरुस्तीवर पाणी

महापालिकेकडून खड्डेमुक्त रस्ता करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला, मात्र सुमार गुणवत्तेपुढे तंत्रज्ञान फिके पडले
Road sweep in Municipal Office Chowk and in front of Police Petrol Pump
Road sweep in Municipal Office Chowk and in front of Police Petrol Pumpesakal
Updated on

Nashik Damaged Road : महापालिकेकडून दरवर्षी खड्डेमुक्त रस्त्यांचा संकल्प केला जातो. त्यासाठी करोडो रुपये खर्चदेखील होतात. परंतु ‘नेमिची येतो पावसाळा’ या युक्तीप्रमाणे रस्त्यांवर खड्डे पडतात.

या वर्षीदेखील आश्वासने व संकल्पनाच्या भडिमारात वाहनचालकांचे कंबरडे मोडणारे खड्डे रस्त्यावर पडले आहे. महापालिकेकडून खड्डेमुक्त रस्ता करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला, मात्र सुमार गुणवत्तेपुढे तंत्रज्ञान फिके पडले. (Nashik Damaged Road Technology pales in comparison to modest quality potholes on road)

महापालिका हद्दीमध्ये तातडीची बाब म्हणून बांधकाम विभागाला ३५ कोटी रुपये खर्च करण्यासाठी मुभा असते. अंदाजपत्रकातच या विषयाला मंजुरी दिलेली असते. त्यामुळे नव्याने मंजुरी घेण्याची आवश्यकता नसते.

नवरात्र व गणेशोत्सव काळात रस्त्यावरील खड्डे भरणे, नगरसेवकांच्या व नागरिकांच्या मागणीनुसार कच किंवा मुरूम टाकणे अशा किरकोळ स्वरूपांसाठी हा निधी असतो. या वर्षी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पावसाळ्यात नागरिकांच्या तक्रारी येण्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे नवीन तंत्रज्ञान वापरून भरावे, अशा सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने महापालिकेच्या बांधकाम विभागाने सहा विभागात कामे दिले. त्यानुसार अनेक ठिकाणी कामे झाली. महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून करण्यात आलेल्या खड्ड्यांसह महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Road sweep in Municipal Office Chowk and in front of Police Petrol Pump
Nashik Rain Update: पावसाळ्यातला पहिला विसर्ग...! ‘दारणा’पाठोपाठ गंगापूर धरणातून विसर्ग

मात्र तीन ते चार दिवसांच्या रिमझिम पावसाने बुजविलेले खड्डे पुन्हा वर आले आहे. अनेक भागांमध्ये अशा प्रकारचे खड्डे जागोजागी दिसत असून, त्याअनुषंगाने राजकीय आंदोलनेदेखील सुरू झाली आहे.

देयके दाखल झाल्यानंतर जवळपास ३० कोटी रुपये ठेकेदारांना अदा करावे लागणार आहे. मात्र दुसरीकडे बुजविलेले खड्डे पुन्हा तयार झाल्याने ठेकेदारांना जाब विचारणारे यंत्रणा नसल्याने महापालिकेने बुजवलेल्या खड्ड्यावर झालेला खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने माजी नगरसेवकांना दाद मिळत नाही, मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा चर्चेचा ठरणार आहे.

मुख्यालयाभोवती खड्डा ‘हब’

नाशिक महापालिका मुख्यालयाबाहेर पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसाच्या पहिल्या टप्प्यातच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे महापौरांच्या रामायण बंगल्यापासून ते कुलकर्णी गार्डन दरम्यानच्या रस्ता हा खड्डा हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

Road sweep in Municipal Office Chowk and in front of Police Petrol Pump
Nashik News: ‘ग्रीन फिल्ड’ मूल्यांकन लटकले; सोलापूरच्या आंदोलनाचा परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.