Navratri 2024 : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त; महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी, निर्भया पथकांस पोलिस सतर्क

Navratri 2024 : नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस सतर्क आहेत.
Nirbhaya teams
Nirbhaya teamsesakal
Updated on

नाशिक : नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस सतर्क आहेत. नवरात्रोत्सवात शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गोपनीय शाखांसह दहशतवादीविरोधी पथकांचीही करडी नजर राहणार आहे. कालिका देवी यात्रोत्सवासाठी जादा फौजफाटाही मागविला असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया आणि दामिनी पथकेही सज्ज आहेत. (Damini Nirbhaya teams have been alerted by police for safety of well equipped women in wake of Navratri festival )

येत्या गुरुवारी (ता.३) घटस्थापना असून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. शहराची कुलदेवता कालिका देवी आणि भगूर येथील रेणुका देवी मंदिर येथे सालाबादप्रमाणे यात्रोत्सव आहे. लाखो भाविक यानिमित्ताने यात्रेत येतात. विशेषत: महिलांची लक्षणीय गर्दी असते. पहाटे चार ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत कालिका देवी मंदिरात भाविकांची रेलचेल असते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवणार आहे.

तर, नाशिक ग्रामीणमध्ये सप्तशृंग गड, चांदवड येथील रेणुका देवी मंदिर याठिकाणीही यात्रोत्सव असून भाविकांची गर्दी असते. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात पोलिस ठाणेनिहाय कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तर, सप्तशृंगगड व चांदवड येथे अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. यात्रोत्सवात चोऱ्या, दागिने ओरबाडणे, चेनस्नॅचिंग या सारख्या गंभीर घटना लक्षणीयरित्या वाढतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. २१ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ३० महत्त्वाच्या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्ताने गर्दी होते. (latest marathi news)

Nirbhaya teams
Navratri 2024 : तुळजाभवानी संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन,नऊ दिवस धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल

प्रत्येक तासाला गस्त

शहराची कुलदेवता कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यादरम्यान गडकरी चौक ते महामार्ग रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो. पहाटेपासून महिला दर्शनाला येतात. याच संधीचा फायदा घेत चेनस्नॅचर्सकडून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती खेचून नेल्याचे प्रकार घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविली आहे. यात्रोत्सवासाठी जादा बंदोबस्त तैनात केला आहे. गस्ती पथके दर तासाने शहर-परिसरात गस्त घालणार आहेत. यात्रोत्सव मार्गावर सीसीटीव्हीद्वारे पोलिस करडी नजर ठेवणार आहेत.

मदतीसाठी डायल ११२

नवरात्रोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ डायल ११२ यावर संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. यात्रोत्सवाच्या गर्दीत महिला, लहान मुले यांच्या अंगावरील दागिने चोरी जात असल्याने त्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही बसविले असून त्याद्वारे करडी नजर ठेवणार आहे.

''कालिका देवी नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. पोलिसांनाही सतर्कतेसाठी पोलिस सज्ज आहेत. विशेष पथकांकडून गस्त सुरू राहतील.''- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

Nirbhaya teams
Navratri 2024 : देवी मूर्तीवर कारागिरांचा अखेरचा हात! अंतिम टप्प्यात; सप्तशृंग, दुर्गादेवी मूर्तीस मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.