Nashik Water Shortage : दीड महिना उलटूनही कसमादेतील धरणे कोरडीठाक! पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसला

Nashik News : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला तरीही तालुक्यासह कसमादेत मुसळधार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत वेळोवेळी पाऊस होत गेले.
Water Shortage
Water Shortageesakal
Updated on

मालेगाव : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला तरीही तालुक्यासह कसमादेत मुसळधार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत वेळोवेळी पाऊस होत गेले. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने विभागात ९० टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. असे असले तरी नद्या, नाले, तलाव, पाझर तलाव कोरडेच आहेत. कसमादेतील धरणांमध्ये अल्प जलसाठा आहे. (Nashik Water Shortage)

इतरत्र पडणारा पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात मात्र रुसला आहे. धरणे कोरडीठाक असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती होती. पाऊस कमी झाला असला तरी धरणे मात्र भरली होती. मालेगाव शहरासह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना लाभदायी असलेल्या चणकापूर धरणात यंदा आतापर्यंत केवळ ११७ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे.

गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत जलसाठा ९८१ दशलक्ष घनफूट होता. मोसम खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी धरणात १०५ दशलक्ष घनफूट इतका अल्प जलसाठा आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ५३५ दशलक्ष घनफूट जलसाठा होता. केळझरमध्ये केवळ ११ दशलक्ष घनफूट पाणी आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत २१२ दशलक्ष घनफूट एवढे पाणी होते. पुनंदमध्ये १८० दशलक्ष घनफूट सध्याचा जलसाठा आहे.

गेल्या वर्षी तो ६०१ दशलक्ष घनफूटापर्यंत होता. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरणात केवळ ११ टक्के पाणी आहे. सध्या धरणात २ हजार १७३ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत तो ३ हजार ५६७ दशलक्ष घनफूट एवढा होता. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस झाला नसला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र जून-जुलैमध्ये दमदार पाऊस झाला होता. (latest marathi news)

Water Shortage
Nashik Police : आयुक्तांचा दणका, प्रभारींच्या उचलबांगडी; काही थेट कंट्रोल रूममध्ये

चणकापूर, पुनंद, केळझर व हरणबारी या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु होता. धरणातील पाण्याच्या विसर्गाने गिरणा व मोसम नदीला पूर येतो. या दोन्ही नद्यांच्या पूरपाण्यावरच गिरणा धरणाचे भवितव्य अवलंबून आहे. गिरणा धरणातील बहुतांशी पाण्याचा वापर खानदेशसाठी होतो. धरणांमध्ये जलसाठा वाढत नसल्याने कसमादेसह खानदेश वासियांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

सध्याचा जलसाठा (दशलक्ष घनफुटात)

धरणाचे नाव - साठवण क्षमता - उपलब्ध साठा - टक्केवारी

चणकापूर - २४२७ - ११७ - ४.८२

हरणबारी - ११६६ - १०५ - ९.०१

केळझर - ५७२ - ११ - १.९२

नागासाक्या - ३९७ - ०० - ००

गिरणा - १८५०० - २१७३ - ११.७५

पुनद - १३०६ - १८० - १३.७८

माणिकपुंज - ३३५ - ०० - ००

Water Shortage
Nashik News : प्रत्येक घरात स्वामी सेवा पोचणे गरजेचे : अण्णासाहेब मोरे; समर्थ सेवामार्ग गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.