नाशिक : गणेशोत्सवात आरास-देखावे पाहण्यासाठी तर, नवरात्रोत्सवामध्ये मध्यरात्रीपर्यंत रास-दांडिया-गरबा खेळण्यासाठी तीन दिवसाची परवानगी दिली जाते. त्यानुसार, पोलीस आयुक्तालयाने उद्यापासून (ता. ९) शनिवारपर्यंत (ता. १२) चार दिवस मध्यरात्रीपर्यंत रास-दांडिया व गरबा खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी चार दिवस तरुणाईला मध्यरात्रीपर्यंत डीजेच्या तालावर थिरकता येणार आहे. ( Dandiya has been allowed by police in view of Navratri Festival till midnight )
गेल्या ३ तारखेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, येत्या शनिवारी (ता. १२) दसर्याला समारोप होईल. नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण असते, ते रासदांडिया आणि गरबा खेळण्याचा. यासाठी तरुणाई नवरात्रोत्सवाच्या महिनाभर आधीपासूनच तयारी करीत असतात. ऐरवी रात्री दहा वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळण्यास परवानगी असते. दांडिया, गरबा खेळण्यासाठी तरुणाईसह महिला, लहान मुलांमध्येही आकर्षण असते. मात्र दहाच्या ठोक्यालाच डीजे बंद करावा लागतो. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. (latest marathi news)
परंतु उद्यापासून सलग चार दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दांडिया खेळता येणार असल्याने तरुणाईसह गरब्याचा आनंद घेणार्यांना थिरकता येणार आहे. पोलीस आयुक्तालयातर्फे परवानगी जारी करण्यात आली आहे. परंतु यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्र्वभूमीवर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात केला असून, गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला व पुरुष पोलिसांचीही गस्ती असणार आहे. तसेच, निर्भया व दामिनी पथकेही परिसरावर करडी नजर ठेवून असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.