Nashik News : निमाणी बसस्थानक अंधाराचे साम्राज्य; पथदीप बंद

Nashik News : निमाणी बसस्थानकाजवळील अनेक पथदीप आणि स्थानकातील काही विद्युत दिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
 Nimani bus stand
Nimani bus standesakal
Updated on

पंचवटी : निमाणी बसस्थानक हे समस्येचे आगार बनल्याचे दिसून येत आहे. निमाणी बसस्थानकाजवळील अनेक पथदीप आणि स्थानकातील काही विद्युत दिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्री प्रवाशांना अंधारात बस शोधावी लागत आहे. सिटीलिंकच्या वाहक, चालकांनादेखील बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. (Darkness prevails as many street lamps near Nimani bus stand)

प्रशासकीय वादाचा फटका मात्र, प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे. २०१०- ११ मध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विकास निधीतून निमाणी बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले होते. यात १३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद आकाराचे नऊ अद्ययावत फलाट, मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रवाशांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था, वाहनचालकांसाठी विश्रामगृह.

बुक स्टॉल, कँटीन, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्त्याची सुविधा करण्यात आली होती. पंचवटीतील निमाणी बसस्थानकातून सातपूर, अंबड एमआयडीसी येथे जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग असते. तसेच पंचवटी हे शैक्षणिक संस्थादेखील आहेत. यामुळे शाळा, कॉलेजला जाणारी विद्यार्थ्यांची ये जा असते. या ठिकाणाहून सिटीलिंक बस लागतात. (latest marathi news)

 Nimani bus stand
Nashik Police Recruitment : पोलीस भरतीतील ‘इडब्ल्युएस’चा पेच कायम; उर्वरित उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणी

गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे या बसस्थानकाची सद्यःस्थितीत कमालीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मोठ्या खड्डे पाण्याची डबकी झालेली असल्याचे दिसून येत आहे. या समस्या बऱ्याच दिवसांपासून सर्वसामान्यांसह प्रवाशांना ते दिसून येत आहे.

यातच भर म्हणून निमाणी बसस्थानकात पथदीप बंद पडली आहेत. रात्री प्रवाशांना अंधारात बस शोधावी लागत आहे. सिटीलिंक वाहक, चालकांनादेखील बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तरी सदर बसस्थानक दुरुस्त होऊन नवीन पथदीप बसविण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून केले जात आहे.

 Nimani bus stand
Nashik News : भूलशास्त्र विभागातर्फे ‘सीपीआर’ जनजागृती आठवडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.