Pharmacy Admission: औषधनिर्माण शास्त्र प्रवेशाची ‘तारखी पे तारीख’! PCI च्‍या निर्णयामुळे खोळंबा; आता पुढच्‍या वर्षीच अध्यययन

Latest Educational News : फक्‍त नोंदणीच्‍या तारखा मात्र बदलत आहेत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्‍या परिपत्रकामुळे हा संपूर्ण घोळ झाला आहे. त्‍यामुळे आता अध्ययन प्रक्रियेला २०२५ उजाडते की काय, अशी सध्याची स्‍थिती आहे.
Pharmacy
Pharmacyesakal
Updated on

नाशिक : औषधनिर्माण शास्त्र शाखेतील पदविका, पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची बोंबाबोंब सुरू असल्‍याचे वृत्त ‘सकाळ’ने सप्‍टेंबरच्‍या सुरुवातीला प्रसिद्ध केले. महिना संपत आला, तरी प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा कायम आहे. फक्‍त नोंदणीच्‍या तारखा मात्र बदलत आहेत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्‍या परिपत्रकामुळे हा संपूर्ण घोळ झाला आहे. त्‍यामुळे आता अध्ययन प्रक्रियेला २०२५ उजाडते की काय, अशी सध्याची स्‍थिती आहे. (Dates for Pharmacy Admission Disruption)

बहुतांश व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्‍या आहेत. नीट परीक्षेतील गोंधळामुळे दाखल जनहित याचिकांमुळे ही प्रक्रिया उशिराने सुरु झाली. तरीही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या एक, दोन फेऱ्यांच्‍या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. दुसरीकडे औषधनिर्माण शास्त्र शाखेच्‍या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही खोळंबलेलीच आहे.

फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियाने ऑगस्टअखेरीस परिपत्रक जारी केल्‍याने हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे. या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांना मान्‍यतेसाठी किंवा फेरप्रस्‍तावासाठी मुदतवाढ दिली होती. सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निकालाचा दाखला देत मान्‍यतेची प्रक्रिया ३१ ऑक्‍टोबरपर्यंत आणि फेरप्रस्‍ताव (अपील)ची प्रक्रिया ३० नोव्‍हेंबरपर्यंत वाढवली आहे. (latest marathi news)

Pharmacy
International Podcast Day 2024: पॉडकास्ट दिवस का साजरा केला जातो अन् जाणून घ्या करिअर कसे कराल?

या परिपत्रकामुळे महाराष्ट्रासह इतरही राज्‍यांमध्ये औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाची प्रक्रिया बारगळली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थी, पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्‍य शासन, सीईटी सेलने तातडीने पाठपुरावा करून प्रवेश प्रक्रियेला गती देण्याची मागणी होत आहे.

केवळ तारखांमध्ये बदल

महिन्‍याभरात वेळावेळी फक्‍त नोंदणी मुदतीच्‍या तारखांमध्ये तेवढा बदल झाला आहे. उर्वरित प्रक्रियेत कुठलीही हालचाल झालेली नाही. सद्यःस्‍थितीत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीची मुदत मंगळवार (ता. १)पर्यंत वाढविली आहे, तर बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम डी.फार्मसीची मुदत सोमवार (ता. ३०)पर्यंत आहे. पदव्‍युत्तर पदवी एम.फार्मसीची प्रक्रियाही रखडली असून, सध्या गुणवत्ता यादीची तारीख जाहीर केली असली, तरी प्रत्‍यक्षात या दिवशी यादी प्रसिद्ध होण्याची शक्‍यता धुसर आहे.

Pharmacy
Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? कसा असेल शेअर बाजाराचा मूड?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.