नाशिक : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राज्यात महायुती सत्तेत राहणार की महाविकास आघाडी पुन्हा बाजी मारणार याच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील विद्यमान आमदारांपैकी कोणाची उमेदवारी कायम राहणार व कोणाचे तिकीट कापणार याकडेदेखील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. येत्या दहा दिवसांत चित्र स्पष्ट होईल. यंदा निवडणुकीत सहा प्रमुख पक्ष त्याव्यतिरिक्त तिसरी आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात असल्याने इच्छुकांना आठ प्रमुख पर्याय आहेत. (dates have been fixed whether Mahayuti will remain in power in state or Mahavikas Aghadi will win again )
त्याव्यतिरिक्त उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करून अपक्ष लढण्याचीदेखील तयारी काहींनी दाखविल्याने बंडखोरी कोणाला महाग पडणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे यंदाची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी अशा दोन प्रमुख लढती होतील. महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष व काँग्रेस या प्रमुख पक्षांचा समावेश आहे.
महायुतीकडे अधिक आमदार आहेत. मात्र सत्तेवर यायचे झाल्यास जवळपास ६० ते ७५ टक्के नवीन उमेदवार देण्याचा भाजपचा फॉर्म्युला अमलात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १६ विधानसभा मतदारसंघापैकी कोणाचा पत्ता कट होईल यावरून विद्यमान आमदारांमध्ये धडधड वाढली आहे. महायुतीमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीकडूनदेखील निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे.
महायुतीमध्ये कसरत
महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडे नांदगाव व मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहे. या दोनव्यतिरिक्त नाशिक शहरातील देवळाली, पश्चिम व मध्य मतदारसंघाची जागा हवी आहे. मात्र देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कडे, तर मध्य व पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार आहेत. (latest marathi news)
भाजप त्यांच्या हक्काच्या जागा सोडणार का, असा प्रश्न आहे. नाशिक शहरातील पश्चिम मध्य व पूर्व यासह चांदवड व बागलाण या मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. पैकी भाजप या पाचही विधानसभा मतदारसंघांवरील दावा सोडणार नाही. मात्र त्याव्यतिरिक्त भाजपला अन्य मतदारसंघ हवे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ते मतदारसंघ सोडेल का, असादेखील प्रश्न आहे.
महाविकास आघाडीत रस्सीखेच
महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येदेखील रस्सीखेच आहे. काँग्रेसने नाशिक मध्य, मालेगाव मध्य, इगतपुरी, चांदवडसह सात मतदारसंघांची मागणी केली आहे. मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उबाठा गटानेदेखील दावा केल्याने काँग्रेस व शिवसेनेत खटके उडण्याची शक्यता आहे. निफाड मतदारसंघामध्येदेखील शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.
दिंडोरीतदेखील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला लढायचे आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडूनदेखील मागणी होत आहे. नांदगाव व मालेगाव बाह्य मतदारसंघ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला हवा आहे. नांदगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला हवा आहे. त्यामुळे मतदारसंघातील गुंतागुंत अधिक वाढत असून, यातून मार्ग काढताना महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पत्ता कट होण्याची भीती
भाजपचा ७५ टक्के नवीन उमेदवार देण्याचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात अमलात आणला जाणार आहे. यात भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील सहभागी होईल. मात्र पहिली लढाई जागावाटपाची होईल. जागावाटपात तिन्ही पक्षांना जागा गेल्यास भाजपच्या अनेक उमेदवारांचा पत्ता कट होण्याची भीती आहे. हीच भीती शिवसेना व राष्ट्रवादी पक्षालादेखील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.