Rahul Gandhi, Sharad Pawar Nashik Daura : शरद पवार-राहुल गांधींची जिल्ह्यात भेट? राहुल गांधींची यात्रा 12 व 14 मार्चला

Nashik Daura : काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ न्याययात्रेदरम्यान १२ व १४ मार्चला नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत.
 Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting
Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting esakal
Updated on

Rahul Gandhi, Sharad Pawar Nashik Daura : काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ न्याययात्रेदरम्यान १२ व १४ मार्चला नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेदेखील १३ व १४ मार्चला नाशिकमध्ये असणार आहेत. या दोन्ही नेत्यांची जिल्ह्यात भेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या भेटीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केला जात आहे. (Nashik Sharad Pawar Rahul Gandhi marathi news)

महाविकास आघाडीच्या दोन दिग्गज नेत्यांची नाशिकमध्ये भेट होणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा १४ मार्चला जिल्ह्यात येत असून, दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम असेल. या दौऱ्यात राहुल गांधी सौंदाणे गावातील एका शेतात मुक्काम करणार आहेत.

त्यानंतर निफाड तालुक्यातील पिंपळगावला ‘रोड शो’ करतील. तेथून नाशिकमध्ये प्रवेश करून येथे ‘रोड शो’ करतील. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक घेतली. या बैठकीत दौरा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. राहुल गांधी दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दोनदिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शरद पवार हे १३ मार्चला नाशिकला येतील. (latest marathi news)

 Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting
Jalgaon Sharad Pawar Daura : दिग्गज नेत्यांचा अमळनेर दौरा ठरणार भाकरी फिरवणारा?

सकाळी अकराला ते एमराल्ड पार्क येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी तीनला निफाड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राष्ट्रवादीतर्फे सायंकाळी निफाडच्या उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केट परिसरात त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होईल. महाविकास आघाडीचे दोघेही बडे नेते जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे या नेत्यांची भेट घडवून एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

चांदवडला शेतकऱ्यांशी संवाद

जिल्हा दौऱ्यावर येत असलेले राहुल गांधी हे चांदवड येथे १४ मार्चला सकाळी आठला चांदवड चौफुली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. गत महिन्यात कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर शरद पवार यांनी चांदवड येथे शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्याच ठिकाणी राहुल गांधी देखील शेतकरी मेळावा घेत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting
Sharad Pawar-Rahul Gandhi Meeting: शरद पवार व राहुल गांधी यांच्यात काय चर्चा झाली? जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.