विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी सोमवारी सिन्नर तालुक्यात दुपारपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दुष्काळाचे संकट दूर झाल्याने शेतकरी वर्गात बैलपोळ्याच्या सणाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे तसेच बाजारातही सर्जा राजाच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेण्यासाठी शेतकरी राजाची लगबग दिसून येत आहे. सिन्नर तालुक्यात तसेच शहरात शेतजमिनी असून या शेतजमिनी कसण्यासाठी आधुनिक तंत्रसामुग्री बरोबरच सर्जा राजाची बैलजोडी ही अनेक ठिकाणी दिसून येते. ( Pithori Amavasya presence of rain is an atmosphere of happiness among farmers )