Nashik News : ‘कृषी’च्‍या थेट द्वितीय वर्षाच्‍या प्रवेशअर्जाची बुधवारपर्यंत मुदत; प्रवेशफेऱ्यांचे वेळापत्रक जारी

Nashik : राज्‍यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्‍ध या कृषी पदवी अभ्यासक्रमांच्‍या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
admission
admissionesakal
Updated on

Nashik News : राज्‍यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्‍ध या कृषी पदवी अभ्यासक्रमांच्‍या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पदविका शिक्षणक्रम पूर्ण केलेल्‍या विद्यार्थ्यांना पदवीच्‍या थेट द्वितीय वर्षात प्रवेशाची संधी उपलब्‍ध आहे. त्‍यानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना बुधवार (ता. ५) पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. सीईटी सेलतर्फे यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. (Deadline for agriculture degree direct 2nd year admission till Wednesday )

केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चिती करता येईल. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी थेट द्वितीय वर्ष कृषी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी व त्‍यानंतरच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे, असे स्‍पष्ट करण्यात आले आहे. इतर विविध अभ्यासक्रमांप्रमाणे या प्रक्रियेतही प्रवेशफेऱ्यांच्‍या माध्यमातून प्रवेश निश्‍चिती केली जाईल. राज्‍यातील कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. (ऑनर्स व कृषी) या व्‍यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्‍या थेट दुसऱ्या वर्षासाठी ही प्रक्रिया पार पडत आहे. (latest marathi news)

admission
Nashik News : माजी आमदारांच्या संपर्क कार्यालयावर हातोडा! महापालिकेकडून कारवाई

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक असे ः

- प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज ः ५ जुलैपर्यंत

- अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी ः ८ जुलै

- यादीसंदर्भात तक्रार नोंदणीची मुदत- ९ ते ११ जुलै

- अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी- १३ जुलै

- पहिल्‍या फेरीसाठी प्राधान्‍यक्रम निवड- १४ जुलै

- पहिल्‍या फेरीची वाटप यादी प्रसिद्धी- १६ जुलै

- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत- १७ ते १९ जुलै

उपलब्‍ध जागांची स्‍थिती-

शासकीय/अनुदानित ः २३१

विनाअनुदानित ः ९५१

admission
Nashik News : नोकरी संदर्भात बनावटी नियुक्ती पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल; सावध राहण्याचे महानिर्मितीचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.