नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवार (ता. १२)पर्यंत मुदत असेल. नाशिक जिल्ह्यात तीन हजार १६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तरीही ४० टक्के जागा अद्यापही रिक्त असून, राज्यस्तरावरही अशीच परिस्थिती आहे. न्यायालयात दाखल याचिकांमुळे प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्याने प्रवेशांवर त्याचा फटका बसला आहे. शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटत असताना, अद्यापपर्यंत आरटीई प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. (Deadline till Thursday for admission of 40 percent vacant seats in RTE)