सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील जंगलालगतच्या नियत क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळेलगतच्या शेतात वन्यजीवांच्या अधिवासाच्या हद्दीवरून झालेल्या झुंजीत अवघ्या सहा महिने वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १७) उघडकीस आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. माणी येथे शेतमालक रामदास सीताराम चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४६ मध्ये घडलेली घटना ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. (Death of fighting leopard cremation incident at Mani by forest department )