NDCC Bank Debt Recovery : जिल्हा बँकेची कर्जवसुली तूर्त स्थगित! शेतकरी संघटनांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Latest NDCC Bank News : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २३) शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. या वेळी बँक प्रशासक व बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
NDCC Bank
NDCC Bankesakal
Updated on

NDCC Bank Debt Recovery : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुलीस दोन दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आहे. (Debt recovery of NDCC Bank suspended for now)

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २३) शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. या वेळी बँक प्रशासक व बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी आंदोलक म्हणाले, की थकबाकीचे सर्व कर्ज माफ करावे, बँकेने सक्तीची वसुली बंद करावी, लिलावाच्या नोटिसा तत्काळ बंद करा, शासन निर्णय घेईल, तोपर्यंत बँकेने शेतकऱ्यांचे कोणते थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊ नये, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या.

यावर जिल्हाधिकारी शर्मा यांनी पुढील दोन दिवस सक्तीची वसुली करण्यासंदर्भात स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना त्रास देण्यात येऊ नये, अशा पद्धतीचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले. त्यावर प्रशासकांनी यापुढे अशी कार्यवाही करण्यात येणार नाही, असे सांगितले. (latest marathi news)

NDCC Bank
Jayant Patil News : नराधम गेला पण शिक्षणसंस्थेचे काय? शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात

बैठकीस जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, विशेष कृषी वसुली अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे, कार्यकारी संचालक दीपक पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे उपस्थित होते.

"शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहील. गुरुवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात येईल."- भगवान बोराडे

NDCC Bank
Shiv Sena Controversy : शिवसेना ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; इंगवलेंचा पवारांवर रोष, काॅल रेकॉर्डिंग व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.