Nashik Farmers Debt Relief Scheme : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ४८४ शेतकऱ्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. जिल्ह्यातील एक हजार २२६ शेतकऱ्यांना आधार जोडणीसाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पहिल्यांदा मुदत दिली.
या कालावधीत ७४२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून, ४८४ शेतकरी प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची मुदत १८ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी सांगितले. (Debt Relief Scheme 484 farmers in district destitute)