नाशिक : एलएलबीच्‍या प्रवेशासाठी उजाडणार डिसेंबर

पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत चालणार संपूर्ण प्रवेश प्रक्रिया
LLB Admission
LLB Admissionesakal
Updated on

नाशिक : कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत तीन व पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तब्‍बल पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सीईटी सेलने संभाव्‍य वेळापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार डिसेंबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यात पहिल्‍या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

सीईटी सेलतर्फे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली होती. यापैकी बहुतांश सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. तसेच काही शिक्षणक्रमांचे संभाव्‍य वेळापत्रकही जारी केले आहे. विधी शाखेच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश वेळापत्रकाचाही यात समावेश आहे. पदवीनंतर तीन वर्षे, तर इयत्ता बारावीनंतर पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी शिक्षणक्रमास प्रवेशाची संधी उपलब्‍ध आहे. सद्यस्‍थितीत महाविद्यालयांकडून उपलब्‍ध जागांच्‍या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्‍यक्ष प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थेट डिसेंबरच्‍या अखेरच्‍या आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

LLB Admission
नाशिक : महापालिकेचा दिव्याखाली अंधार

पाच वर्षे एलएलबीचे संभाव्‍य वेळापत्रक असे

पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी शिक्षणक्रमासाठी शुक्रवारी (ता. १२) माहितीपत्रक जारी होण्याची शक्‍यता आहे. संभाव्‍य वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी २२ ते ३० नोव्‍हेंबरदरम्‍यान कालावधी उपलब्‍ध केला जाईल. यानंतर ई-स्‍क्रुटीनी अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. अल्‍फाबेटिकल मेरीट लिस्‍ट ७ डिसेंबरला जाहीर होणार आहे. हरकती, तक्रार नोंदविण्यासाठी ८ ते १० डिसेंबरची मुदत दिली जाईल. २० डिसेंबरला पहिली निवड यादी जाहीर केली जाणार आहे.

तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबीची अशी आहे प्रक्रिया

तीन वर्षे कालावधीच्‍या शिक्षणक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी २९ नोव्‍हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. स्‍क्रुटीनी प्रक्रिया राबविल्‍यानंतर १६ डिसेंबरला अप्‍फाबेटिकल मेरीट लिस्‍ट प्रसिद्ध होणार आहे. हरकती नोंदविण्यासाठी १७ ते २० डिसेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे, तर पहिली वाटप यादी ३० डिसेंबरला प्रसिद्ध होणार असल्‍याचे संभाव्‍य वेळापत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()