Nashik News : सप्तशृंगगडावर आत्महत्येच्या उद्देशाने आलेल्या नाशिक येथील अल्पवयीन मुलीचे व्यावसायिक व गडावरील चालता-बोलता मदत केंद्राचे अध्यक्ष संदीप बेनके यांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले असून, मुलीला पोलिसांच्या मदतीने नातेवाइकांकडे सुखरूप सुपूर्द केले आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी नाशिक येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी सप्तशृंगगडावर रोप-वेच्या परिसरात पूजेचे साहित्य व प्रसाद विक्री करणाऱ्या व्यावसासिकांना संशयास्पद स्थितीत निदर्शनास आली. (Deciding to end life due to poverty )
गडावर दाट धुके असल्याने मुलगी गडावर दर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील सदस्यांपासून चुकली असावी, असे सुरवातीला व्यावसायिकांना वाटल्याने त्यांनी तिची चौकशी केली असता ती गडावर एकटीच आल्याचे व मला परत घरी जायचे नसल्याचे तिने सांगितले. तिचे बोलणे विचित्र वाटल्याने व्यावसासिकांनी गडावरील चालता-बोलता मदत केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष संदीप बेनके यांना याबाबतची माहिती दिली. (latest marathi news)
बेनके यांनी मुलीला विश्वासात घेत तिची विचारपूस केली असता ती गडावर आत्महत्येच्या उद्देशाने आल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या वेळी मुलीकडे कुटुंबीयांसाठी चिठ्ठीही लिहून ठेवल्याचे आढळल्याने याबाबत बेनके यांनी नांदुरी पोलिस चौकीत माहिती देत पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ती गडावर आत्महत्येसाठीच आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तिची समजूत काढत तिच्या घरच्यांची माहिती व मोबाईल क्रमांक मिळवत संपर्क साधत नांदुरी येथे मुलीच्या घरच्यांना बोलावून घेतले. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी, नाईक नितीन देवरे, नीलेश शेवाळे, सचिन राऊत यांनी कार्यतत्परता दाखवत रात्री उशिरा जाबजबाब घेत घरच्यांना बोलावून ताब्यात दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.